Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: महिलेचा रुद्रावतार! लेकीची छेड काढणार्‍याला पोकळ बांबूचे फटके दिले; व्हिडिओ पाहून कौतुक कराल

Viral Video: सोशल मीडियावर सध्या राजकोटमधील एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात मुलीची छेड काढणाऱ्या व्यक्तीला मुलीच्या आईनेच चांगलाच चोप दिलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या काही महिन्यापासून महिलासोबत छेड काढणाऱ्या घटना वाढत आहेत. कधी महाराष्ट्रामधून अनेक घटना उघडकीस येतात तर कधी अन्य राज्यातून. अशातच राजकोचमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या व्यक्तीला एका आईने चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली आहे. मात्र याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओतील घटना राजकोटमध्ये घडली आहे. मिळालेल्या मीडिया रिपोर्टनुसार, व्हिडिओमधील (Video) व्यक्ती काही दिवसांपासून महिलेच्या मुलीची छेड काढत होता. मात्र ही घटना मुलीच्या आईला समजताच, ती रागाने संतापते आणि छेड काढणारा घराबाहेर दिसताच महिला त्याला मारण्यासाठी धावते. सध्या राजकोटमधील व्हिडिओ चर्चेचा विषय (Subject) ठरला आहे.

काय आहे व्हिडिओ?

व्हायरल व्हिडिओ एक महिला दिसून येत आहे. जिने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. शिवाय तिच्या हातात एक लांब काठी आहे, ज्या काठीच्या साहाय्याने ती त्या व्यक्तीला मारहाण करताना दिसून येत आहे. महिलेचा राग इतका अनावर होतो की ती त्या छेड काढणाऱ्या व्यक्तीला वारंवार काठीने मारत होती. मात्र परिसरात असलेले नागरिक महिलेला थांबण्याचा प्रयत्न करत होते. महिलेचा संताप आणि उग्र रुप पाहून परिसरातील प्रत्येक व्यक्ती आश्चर्यचकित झालेले दिसत आहेत.

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@gharkekalesh'' या अकाउंवट शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर करताच नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया केल्या आहेत. त्याकील एका यूजरने कमेट्सबॉक्समध्ये लिहिले आहे की,'' व्हिडिओतील व्यक्तीला दिलेला मार पाहून आनंद झाला'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''काठी नव्हती घेयला पाहिजे त्याऐवजी तलवार पाहिजे होती'' तर बाकी यूजर्संनी महिलेचे कौतुक केले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poha Side Effects : रोज पोहे खाताय? मग सावधान! ब्लड शुगरसह 'या' ३ गंभीर समस्यांचा वाढतो धोका

Maharashtra News Live Update: ST महामंडळाच्या ऑडिटवरून भाजप शिंदेसेना संघर्ष पेटणार

Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात या महिन्यात किती पैसे येणार? पाहा अपडेट

Rava Khobryache Modak Recipe : ना उकड, ना जास्त मेहनत! फक्त २ पदार्थांत बनवा गणरायाचे आवडते रवा-खोबऱ्याचे मोदक

Vidyanand Bapat: श्रद्धेचा अवमान नको! विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस; ४८ तासांत बिनशर्त माफीची मागणी

SCROLL FOR NEXT