Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अर्रर्र... काय लावलेय? गटाराच्या पाण्यात बुडवून सोनपापडी खाल्ली, किळसवाणा video

Viral Video News: सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका व्यक्तीने सोनपापडी गटारीच्या पाण्यात बुडवून खाल्ली आहे.

Tanvi Pol

Man Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला अनेक खाद्यप्रेमींचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. खाद्यप्रेमी अनेक नवीन ठिकाणी जाऊन तेथील पदार्थांबाबत व्हिडिओतून सांगत असतात. मात्र अनेकदा काही खाद्यपदार्थांचे व्हिडिओ असे असतात की जे पाहून किळस येईल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीने गटारीच्या पाण्यात बुडवून सोनपापडी खाल्ली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओत तुम्हाला एक व्यक्ती दिसून येत आहे. जो गटारीच्या पाण्याजवळ उभा असून त्याच्या हातात एक सोनपापडीचा बॉक्स आहे. काही वेळात तो व्यक्ती सोनपापडीचा बॉक्स ऑपन करतो आणि सोनपापडीचा डब्बा गटारीच्या पाण्यात बुडवतो आणि गटारीच्या पाण्याने ओली झालेली सोनपापडी खाताना व्हिडिओत(Video) दिसत आहे. सर्व व्हिडिओ त्या व्यक्ती सोबत असलेल्या एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

सोशल मीडियावर या व्यक्तीने अनेक असे अतरंगी व्हिडिओ आहेत शिवाय हा व्हिडिओ त्या व्यक्तीने स्वता:च्या इन्स्टाग्राम अकाउंवर पोस्ट केलेला आहे. जो व्हिडिओ ''@punitsupper_star'' या अकाउंटवर पाहता येत आहे. व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे शिवाय अनेक नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या असून त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''याला धरुन मारा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,'' लोक काय करतील सांगता येत नाही'' तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया लिहिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT