Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मेट्रो-3 मध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांना मनस्ताप, तब्बल १ तास मेट्रोत अडकले पब्लिक, व्हिडीओ व्हायरल

Mumbai Metro Viral Video: सोशल मीडिया मुंबई मेट्रोमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुन्हा काय घडले असेल ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Mumbai Meteo: आपल्यापैंकी प्रत्येकाने मुंबई लोकलचा प्रवास केला असेल मात्र सध्या सर्वत्र मुंबई मेट्रोची चर्चा आहे. मुंबई मेट्रोमुळे अनेकांचा प्रवास करणे सुखकर झाले आहे. गेल्या काही वर्षात सुरुवातीस मुंबई मेट्रोचा एकच मार्ग होता मात्र काही वर्षापासून मुंबई मेट्रोचे जाळे विस्तारले आहे. सोशल मीडियावर आपण मुंबई मेट्रोमधून प्रवास केलेल्या प्रवाशांचे अनेक अनुभव ऐकले मात्र पुन्हा एकदा सोशल मीडियावर मुंबई मेट्रोचा एक व्हिडिआ व्हायरल होत आहे. ज्यात मुंबई मेट्रोच्या काही तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोत प्रवासी अडकले आहेत.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला मेट्रोमधील आतील बाजू दिसत आहे. या मेट्रोमध्ये अनेक प्रवासी बसलेले आहेत, ज्यात लहानांपासून ते वयोरुद्ध व्यक्तीचा समावेश आहे. या मेट्रोमध्ये एक तरुणी आहे जी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ बनवत आहे आणि म्हणत आहे की,'' आम्ही गेल्या १ तासापासून मरोळ ते एका स्टेशनच नाव घेत शिवाय मेट्रोमध्ये (Metro)लहान चिमुकली आहेत ती ही रडत आहे'' अशी ती मेट्रोतील प्रसंग दाखवत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून असे समजते की काही तांत्रिक कारणांमुळे मेट्रो १ तासापासून एका जागी थांबलेली आहे.

मुंबई मेट्रोचा व्हिडिओ 'इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''mumbai.hai.bhai''या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यासोबत कॅप्शनमध्ये,''तासभर मुंबई मेट्रोमध्ये लोक अडकले'' असे लिहिण्यात आलेले आहे. १२ तासांपूर्वी व्हिडिओ पोस्ट करताच असंख्य नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती दिलेली आहे शिवाय हजारोंच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत.

सोशल मीडियावर मुंबई मेट्रोचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''ही मुंबई मेट्रो ३ खूप गोंगाट करणारी आहे'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''या मेट्रोमध्ये प्रवास करणे कठीण 3 खूप गोंगाट करणारी मेट्रो'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT