Akola CCTV Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Akola CCTV Video: पोलिसांना चकवा देत आरोपी फरार; सर्व घटना सीसीटीव्हीत कैद

Viral Cctv Video: गांजा तस्करी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी अकोला रेल्वे पोलिसांच्या तावडीतून फरार झाला. सोशल मीडियावर सर्व घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

अक्षय गवळी, साम टीव्ही

Akola Viral Video: सोशल मीडियावर सध्या जालना शहरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या घटनेत २५ किलो गांजा तस्करी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी अकोला रेल्वे पोलिसांच्या तावडीतून फरार झाला आहे. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समाज माध्यमामध्ये या व्हिडिओची चर्चा होताना दिसून येत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला हॉटेल रूमच्या बाहेरील मोकळी जागा दिसत आहे. ज्यात व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की, आरोपीला पायाला दोऱ्या बांधलेल्या आहेत. मात्र तो दोऱ्या सोडून हळू-हळू बाहेर पसार होताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पाहिले तर आरोपी पळून जातो. सर्व घटना रुमच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये(cctv) कैद झालेली आहे

नेमके प्रकरण काय?

ओडीसा राज्यातील २ आरोपींना अकोला रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून तीन लाख ७४ हजार किंमतीचा २५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. अकोला रेल्वे स्थानकावर दोन प्रवाशांकडून हा गांजा जप्त केला होता. बिकु अब्राहम मंडल आणि जुवेल मांगा साबर त्यावेळी या दोघांना अटक करण्यात आली होती. अटकेतील आरोपी जुवेल साबर याला रेल्वे पोलिसांनी तपासासाठी ओडिसा येथे घेऊन गेले होते. पोलिसांचा रात्रीचा मुक्काम एका हॉटेलवर होता. याच दरम्यान गाढ झोपेत असलेल्या पोलिसांच्या तावडीतून जुवेल साबर हा फरार झाला. आरोपी फरार होत असतानाचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले.

व्हायरल होत असलेली घटना इस्टाग्रामवरील,''@saamtv'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेली आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''गांजा तस्करी प्रकरणातील आरोपी फरार!'' असे लिहिले आहे. व्हिडिओ पोस्ट करताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून बऱ्याच यूजर्संनी विविध प्रतिक्रियीही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''आणि पोलीस काय करत होते''तर बऱ्याच यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT