Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: सेल्फीचा नाद लय बेकार...पाय घसरुन पडली अन् १२ तास अडकून राहिली; पाहा VIDEO

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेमके काय घडले आहे व्हिडिओत तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Viral Video: गेल्या अनेक महिन्यापासून सेल्फी घेताना बऱ्याच व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. मग कधी धबधब्यावर सेल्फी घेताना तर कधी डोंगरावरुन, अशा अनेक घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समजत असून अनेकदा संपूर्ण घटनेचा थरार ही व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळतो. सध्या सोशल मीडियावर अशीच एक घटना गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. ज्यात सुद्धा सेल्फी घेताना दगडांमध्ये अडकलेल्या तरुणीला सोडवण्याचा थरार रंगला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत काही पोलिस कर्मचारी किंवा सुरक्षा कर्मचारी दिसून येत आहे, जे धबधब्याच्या दगडाजवळ तरुणीला दगडातून सुखरुप सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहेत. त्या परिसरात असलेल्या एका व्यक्तीने सर्व रेस्क्युची घटना कॅमेऱ्यात कैद केलेली आहे. व्हिडिओत(Video) पुढे पाहिले तर दिसेल की शेवट पर्यंत सर्व दगडांमध्ये अडकलेल्या तरुणीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत शेवटी तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर तरुणीला बाहेर काढण्यात त्यांना यश येते.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही मात्र इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''तरुणाईच हे कायमच झाले आहे'' तर काही यूजर्संनी संताप व्यक्त केलेला आहे तर अनेक यूजर्संनी तरुणीला सुखरुप सोडवलेल्या प्रत्येक व्यक्तीचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

SCROLL FOR NEXT