Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: फटाके फोडण्यावरून शेजारी भिडले, संतापलेल्या व्यक्तीने छतावरून सिलेंडर फेकला...; पाहा VIDEO

Shocking Viral Video: वाद-विवाद होणे सध्या साधारण बाब झालेली आहे. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या वादाचे कारण फटाके फोडण्याचे आहे. पुढे या वादाचे रुपातंर भयानक घटनेत झालेले आहे ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Diwali Viral Video: गेल्या काही दिवसांपासून देशभरात दिवाळीचा उत्साह सर्वांमध्ये दिसून येत आहे. दिवाळीमध्ये प्रत्येकजण मोठ-मोठे फटाके फोडण्यासाठी उत्साही असतो मग काय लक्ष्मी पुजनच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात येतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिवाळीच्या दिवशीचा आहे,ज्यात फटाके फोडण्याचा राग आल्याने शेजाऱ्याने चक्क रागात खाली सिलेंडर फेकून मारलेला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक नागरी वस्ती दिसून येत आहे. जो परिसर संपूर्ण दिवाळीच्या रोशनाईने सजलेला आहे. अनेक ठिकाणी फटाके फोडताना काही व्यक्ती दिसून येत आहेत मात्र त्या दरम्यान व्हिडिओत पाहिले तर काही कुटुंबात भाडंण होताना दिसून येत आहे. ज्यात भररस्त्यात एक सिलेंडर जमिनीवर पडलेला दिसतो मात्र तुम्ही व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकले तर समजले की फटाके (firecrackers) फोडायचे नाही खाली म्हणून एका व्यक्तीने वरुन सिलेंडर फेकून मारलेला आहे. पुढे घडलेली घटना एक व्यक्ती मोबाईमध्ये कैद करत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट केलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''फटाके फोडण्यावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद, संतापलेल्या व्यक्तीने सिलेंडर छतावरून खाली फेकले, व्हिडिओ व्हायरल'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पोस्ट करुन एक दिवस होताच आतापर्यंत व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''आता अजून फटाके फोडून शेजारी जळण्यास लागले आहेत, काय दिवस आले'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''शेजारी कधीही आनंदी होऊ इच्छित नाहीत, ते हेवा करतात'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''आतापर्यंत पाहिलेले भयानक भांडण होते''अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

SCROLL FOR NEXT