Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: 'तो तो तो विमान गो' गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?

Mumbai Local Video: सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडिओ तुम्हाला दिसत असतात.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही डान्सचा आहे,मात्र तरुणींनी चक्क लोकल ट्रेनमध्ये तुफान डान्स केलाय.

Tanvi Pol

Girls Dancing Video: मुंबई लोकल ही दररोज लाखोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा तुफान गर्दीतला प्रवास त्यांच्यासाठी दररोजचा झाला आहे.परंतू,या प्रवासादरम्याने बरेचजण विविध कला सादर करण्यासाठी लोकलचा उपयोग करताना दिसतात आणि असे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात.त्यातच एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे,ज्यात काही तरुणी मुंबई लोकलमध्ये भन्नाट डान्स करताना दिसून येत आहेत.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुंबई लोकलमध्ये तीन तरुणी दिसत आहे.या तरुणी सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगला असणारे गाणे म्हणजेच,''तो तो तो विमान गो'' हे गाणं सध्या प्रचंड चर्चेत आहे.धावत्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणी जराही तोल न जाता डान्स करताना दिसत आहेत.त्यातच तुम्ही पाहिलं तर सर्व लोकल रिकामी दिसून येत आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वच जण तरुणींचं कौतुक करत आहेत.

तरुणींच्या डान्सचा व्हिडिओ bunny97_x's या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.सध्या हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिलेला आहे आणि हजारो लाईक्सही मिळालेले आहे शिवाय हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरलेला आहे.खरं तर तरुणींनी लोकल रिकामी असल्याने त्यांनी त्या जागेचा डान्ससाठी पुरेपुर वापर करुन घेतलेला आहे.

डान्स(Dance) व्हिडिओ पाहिल्यांनतर अनेकांनी तरुणींचं कौतरु करत व्हिडिओ शेअरही केलेला आहे.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''डान्स एकदम खतरा आहे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''शेवटी खतरा डान्स''तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''हेच कारण असेल आज एक पण लोकल वेळेवर आली नाही''अशा गंमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: तरुणींचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT