Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वाह! आज की रात गाण्यावर माय-लेकाची जुगलबंदी; चिमुकल्याचा डान्स पाहून तमन्नाला विसराल, VIDEO व्हायरल

Dance Video: सध्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात चिमुकल्याने आज की रात या गाण्यावर धमाकेदार डान्स केलेला आहे. मात्र त्याला साथ दिली ती त्याच्या आईने. डान्सचा व्हिडिओ पहाच.

Tanvi Pol

Dance Video: सोशल मीडियावर दरवेळेस अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात सध्या माय-लेकाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आई हार्मोनियम वाजवत तर दुसऱ्या बाजूला चिमुकला मस्त डान्स करत असल्याचं दिसत आहे. माय-लेकाची जुगलबंदी पाहून तुम्हीही डान्स केल्याशिवायर राहणार नाहीत.

सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यापासून आज की रात हे गाणं प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे. लहानापासून ते मोठ्यापर्यंत शिवाय बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या गाण्यावर रील्स(Reels) व्हिडिओ बनवले आहेत.एवढेच नाही तर या गाण्याची क्रेझ एवढी आहे तरी अनेकजण प्रवासात येता-जात गाणं गुणगुणत आहे. सध्या या गाण्याची क्रेझ माय-लेकावरही पाहण्यास मिळाली आहे,ज्यात चिमुकल्याच्या आईने आज की रात हे गाणं हार्मोनियमवर वाजवत बाजूला चिमुकल्याने या गाण्यावर डान्स केलेला आहे. सध्या सर्व डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला चिमुकला आणि त्याची आई दिसत आहे. सुरुवातीस चिमुकल्याची आई हार्मोनियम वाजवण्यास सुरुवात करते मग चिमुकला काय थांबतोय? आईच्या पाठोपाठ चिमुकल्याने डान्स करण्यास सुरुवात केली. चिमुकल्याचा डान्स पाहून त्याच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद व्हिडिओत दिसत आहे तर हार्मोनियम ती महिला अतिशय उत्तररित्या वाजवत आहे. सर्व व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

आई आणि चिमुकल्यांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ ''ooyesunday''या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही, मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच नेटकरी वर्गातून प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील काही यूजरने चिमुकल्याच्या आईच्या कलेचे कौतुक केलेले आहे तर काहींनी चिमुकल्याचा डान्स पाहिल्यानंतर गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : आई आणि चिमुकल्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT