Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शेवटी आई ती आईच! समुद्रात वाहून जाणाऱ्या लेकीला वाचवले, थराराक घटना कॅमेऱ्यात कैद

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की काय घडले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Viral Video: सोशल मीडियावर कायम अनेक व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झालेल्याच्या घटना समोर येत असतात. अनेकदा मृत्यू होण्याचे कारण व्यक्तीचा निष्काळजीपणा असतो तर कधी अचानक आलेल्या लाटेमुळे पाण्यात बुडतात. मात्र सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात पाण्यात बुडून जाणाऱ्या लेकीला तिच्या आईने वाचवले आहे. सध्या संपूर्ण घटनेचा थरार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण एक समुद्रकिनारा दिसून येत आहे. ज्यात समुद्राच्या किनारी असंख्य पर्यटक समुद्राच्या पाण्यात खेळताना दिसत आहेत.मात्र यात काही वेळाने समुद्राच्या किनारी आई आणि एक मुलगी बसलेली असते मात्र समुद्राची लाट जोरात येते आणि दोघींनी समुद्रात ओढून घेऊन जाते. मात्र दोघीही काही वेळ त्या लाटेच वाहून जाताना दिसत आहे, मात्र व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहिले तर आईने स्वता:चा विचार न करता आपल्या लेकीला वाचवले आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची (Video)चर्चा होत आहे.

आई आणि मुलीचा संपर्ण व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''infoelovly'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठला आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होत आहे.व

सध्या या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहिल्यानंतर अनेक नेटकरी वर्गातून प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' काय गरज होती'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''आई ती आईच असते'' तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''नशीब काही झाले नाही'', अशा अनेक हैराण करणाऱ्या तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT