Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: खानदेशी गाण्यावर आईसोबत तरुणाचा भन्नाट डान्स; व्हिडिओ तुफान व्हायरल

Mother-Son Dance: सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ प्रत्येकाच्या पसंतील आलेला आहे. हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारच्या हाणामारी किंवा कॉमेडी संबंधित नाही, तर आई आणि मुलाचा डान्स व्हिडिओ आहे.

Tanvi Pol

Viral Dance Video: सध्या सोशल मीडियावर एक धमाल व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका तरुणाने आपल्या आईसोबत पारंपरिक खानदेशी डान्स केलेला आहे. खानदेशातील पारंपरिक ढंगात आई आणि मुलगा जोशात नाचताना दिसतात. हा डान्स नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतील आलेला आहे.

व्हायरल डान्स एकदा पाहाच

व्हिडिओत दिसते, गाणं सुरु होताच गाण्याच्या तालावर थिरकण्यास सुरुवात करतात. विशेष म्हणजे, दोघेही गाण्याच्या ठेक्यावर दोघेही समन्वय साधून डान्स करतात. आई आणि लेकाच्या डान्समुळे कुटुंंबातील प्रत्येकजण आनंदी झालेला दिसत असून अनेकांना डान्स करण्या उत्साह देखील आलेला आहे. दोघांच्या डान्सची आठवण म्हणून तेथील एका व्यक्तीने डान्स मोबाईलमध्ये कैद केला आहे.

या प्रकारच्या व्हिडिओजना सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळते. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील love_creation_0.7 या अकाउंटवर अपलोड करण्यात आला शिवाय फेसबूक, ट्वीटरलाही नेटकऱ्यांनी व्हिडिओ शेअर केलेला आहे.

व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पंसतीस

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''नजर नको लागालया'' तर दुसऱ्या यूजरने कमेंटमध्ये म्हटलं,''सध्या असं नातं पाहण्यासाठी मिळत नाही'' तर काहींनी म्हटलं,''आई खूप नशीबवान आहे''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

Kiara Advani Skin Care: कियारा अडवाणीची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

SCROLL FOR NEXT