Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मौत को छूकर टक से वापस! फलाट अन् रेल्वेच्या कचाट्यात सापडला;थरारक Video व्हायरल

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात एक व्यक्ती मरण्याच्या दारातून थोडक्यात बचावला गेला आहे. तुम्हीही एकदा व्हिडिओ पहा.

Tanvi Pol

Bihar Viral Video: सोशल मीडियावर दरदिवशी अनेक अपघाताचे व्हिडिओ पाहण्यास मिळत असतात. काही अपघात इतके भयानक असतात ज्यात काहीच उरत नाही तर काही अपघात असे असतात ज्यात नशीबाने व्यक्तींचा जीव बचावला जातो. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात रेल्वेच्या खाली आल्यानंतरही एका व्यक्तीचा जीव बचावला गेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ बिहारमधील असल्याचे समजत असून त्यातील तो व्हिडिओ बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावर आहे. ज्यात एक व्यक्ती ट्रेनमध्ये चढताना त्याचा पाय घसरल्याने तो फलाट आणि धावत्या ट्रेनच्यामध्ये अडकला जातो. सध्या सर्व व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

नेमके काय घडले?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत समस्तीपूर रेल्वे स्थानकाचा संपूर्ण परिसर दिसत आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर अनेक स्टेशनवरील प्रवासी धावत्या ट्रेनच्या खाली पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला काय खाली आहे हे कळू शकले नाही मात्र ज्या वेळेस संपूर्ण ट्रेन तेथून जाते त्या वेळेस फलाट आणि रेल्वे रुळाच्या अगदी मध्यभागी एक व्यक्ती अडकलेला असतो. हा तोच व्यक्ती जो ट्रेन पकडण्याच्या नादात त्याचा पाय घसरला होता.

व्हायरल होत असलेल्या या घटनेचा व्हिडिओ एक्सवरील ''@Patna_Pulse'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''घडलेल्या घटनेचे संपूर्ण कारण देण्यात आले आहे''.एवढेच नाही तर नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक संतापजनक तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT