Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: भररस्त्यात महिलांचा राडा; थेट महिला कॉन्स्टेबला धू धू धुतलं; पाहा VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर सध्या दोन महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय झाले आहे ते तुम्ही व्हिडिओत पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कायम जगभरातील अनेक घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी थरारक अपघांताचे व्हिडिओ असतात तर कधी धक्कादायक घटनांचे. क्षणात हे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वां पर्यंत काही वेळात पोहचतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात भररस्त्यात महिलांची तूफान हाणामारी होताना दिसत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत दोन महिला आहेत. त्यातील एक महिला पोलिस कॉन्स्टेबल दिसत आहे तर दुसरी महिला सामान्य महिला दिसून येत आहे. व्हिडिओत(Video) पाहिले तर सामान्य महिला आहे ती कॉन्स्टेबल महिलेला मारताना दिसत आहे. ती महिला अतिशय भयानक पद्धतीने तिला हाणताना दिसत आहे. महिला तिला मारत असताना एक व्यक्ती ही हाणामारी सोडवताना दिसून येत आहे.

हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेला असून तो एक्स प्लॅटफॉर्म '@gharkekalesh' या अकाउंटवर पाहता येत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच, 'आरपीएफची लेडी कॉन्स्टेबल आणि एका महिलेमध्ये किरकोळ बाचाबाचीनंतर महिलेने कॉन्स्टेबलला केली मारहाण'' कॅप्शन देण्यात आलेले आहे. शिवाय व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' बायकांचा नाद करु नका'' तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की,'' नक्की कोणाची चुकी'' तर अजून एका लिहिले आहे की,''कोणाची चुकी असेल'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT