Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे...भेळ खाताना जपून, ट्रेनमधील बाथरूमजवळ कापला जातोय कच कच कांदा; किसळवाणा VIDEO व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या ट्रेनमधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो खाद्यप्रेमींनी एकदा तरी पाहावा.

Tanvi Pol

Viral Video: ट्रेनचा प्रवास आपल्यापैंकी प्रत्येकाला कधीना-कधी करावा लागतो. मग कधी ट्रेन प्रवास अनेकांना आवडतो. मात्र ट्रेनचा प्रवास करताना आपल्यासोबत लहान मुलं असल्यास ते कोणतेही पदार्थ घेण्यासाठी पाठी लागतात. एवढेच नाही तर ट्रेनमध्ये अनेक वस्तू विकण्यासाठी येत असतात. त्यातील भेळ हा एक पदार्थ आहे, जो प्रत्येकजण आवडीने घेत असतो. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्ही ट्रेनमधील कोणताही खाद्यपदार्थ खरेदी करण्याआधी १०० वेळा विचार कराल. नक्की असे काय घडले आहे ट्रेन प्रवासात ते तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक ट्रेन दिसून येत आहे. ज्यात एक व्यक्ती दिसत आहे. मात्र व्हिडिओत तुम्ही नीट पाहिले तर दिसेल की, काही तरी पदार्थ चिरताना दिसत आहे. मात्र त्याच्या बाजूला एक खाद्यपदार्थ दिसून येत आहे,ज्या वरुन समजते की तो खाद्यपदार्थ विक्रेता आहे. प्रवाशांना विकले जाणारे खाद्यपदार्थ अशा नको त्या ठिकाणी अतिशय वाईट पद्धतीने केले जात आहे. सर्व धक्कादायक(Shocking) प्रकाराचा व्हिडिओ ट्रेनमधील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे.

ट्रेनमधील सर्व प्रकाराचा व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेला आहे. मात्र तो व्हिडिओ एक्सवरील ''@Tiwari__Saab'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''ट्रेनने प्रवास करताना चुकूनही चने खाऊ नका,ते कसे तयार केले आहे ते पहा'' असे लिहिले आहे. सर्व घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरलेला आहे.

एवढेच नाही तर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'खरे तर ट्रेनने प्रवास करताना चणे खाणे जरा जपूनच खायला हवे! कधीकधी स्वच्छतेचा अभाव असतो, जो आरोग्यासाठी हानिकारक असतो. सुरक्षित रहा'' अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, इंजिनिअर्सच्या मागण्या पूर्ण होणार? वाचा सविस्तर...

High Blood Pressure: ब्लड प्रेशर मोजताना तुम्हीही ही एक चूक करताय का? डॉक्टरांनी सांगितलेली योग्य पद्धत जाणून घ्याच

Accident News : भयंकर अपघात! ३१ मजुरांनी खचाखच भरलेला पिकअप महामार्गावर उलटला, ४ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: करमाळ्यात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळला.

साताऱ्यातील प्रसिद्ध 5 धबधबे, पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT