Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हाताने पंखा थांबवणारे अनेक पाहिले, पण जिभेने १ मिनिटात ५७ पंखे थांबवणारा अवलिया पाहिला का?

Shocking Video: सोशल मीडियावर दरदिवशी अनेक अवलिया व्यक्तींचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जो पाहून प्रत्येकजण सध्या हैराण झालेला आहे.

Tanvi Pol

World Record Video: सोशल मीडियावर कायम विविध ट्रेंड पाहण्यासाठी मिळत असतात. गेल्या काही महिन्यापूर्वी सर्वत्र हाताने पंखा थांबवणाऱ्या लड्डू मुत्त्या बाबाचे वेड लोकांना लागले होते. सामान्य व्यक्तींपासून ते मोठ-मोठ्या कला क्षेत्रातील व्यक्तींनी यावर रील्स केले होते मात्र आता पुन्हा एकदा हाताने नाही तर चक्क जिभेने पंखा थांबवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नेमके प्रकरण काय?

सोशल मीडियायवर सध्या एका व्यक्तीने केलेल्य वर्ल्ड रिकॉर्डचा(World Record) व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तुम्हाला दिसेल की एका स्टेजवर असलेल्या एका टेबलक अनेक टेबल फॅन चालू आहेत. काही वेळाने स्टेजवर असलेला एक व्यक्ती फॅनच्या जवळ जातो आणि जिभेने सर्व वेगाने सुरु असलेले फॅन थांबवतो. व्यक्तीचा हा अनोखा प्रताप पाहून तेथील प्रत्येकजण हैराण झालेले आहे. सध्या या व्हायरल व्हिडिओने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

व्हायरल होत असलेला व्हिडिओमधील व्यक्ती तेलंगणामधील असल्याचे समजते. ज्यात त्या व्यक्तीने अवघ्या एका मिनिटात आपल्या जिभेने तब्बल ५७ विद्युत पंखे थांबवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्यक्तीला आता सोशल मीडियासह प्रत्येक ठिकाणी ''ड्रिल मॅन'' म्हणून ओळख मिळत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

ड्रिल मॅनचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@GWR'' या पेजवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''अशक्य आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले,''बापरे'',अशा अनेक हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : सध्या या व्यक्तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP clash Pune : पुण्यात राष्ट्रवादीत राडा, शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT