Ricky Pond Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Ricky Pond Viral Video: गुलाबी साडीची भुरळ आता परदेशातही; इन्फ्लूएन्सर रिकी पाँडने केला जबरदस्त डान्स; VIDEO VIRAL

Ricky Pond Dance On Gulabi Sadi Song: 'गुलाबी साडी' या गाण्याची भूरळ जगभरात पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींनी या गाण्यावर रिल्स बनवल्या आहेत. त्यानंतर आता रिकी पाँड यानेही 'गुलाबी साडी' गाण्यावर रिल बनवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर सध्या गुलाबी साडी गाण्याचा ट्रेंड सुरु आहे. आतापर्यंत सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनीच गुलाबी साडी गाण्यावर रिल बनवली आहे. गुलाबी साडी गाण्याची क्रेझ आता परदेशातही पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध इन्फ्लुएनसर रिकी पाँडने गुलाबी साडी गाण्यावर रिल बनवली आहे.

संजू राठोडचे गुलाबी साडी हे गाणं न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकले होते. त्यानंतर आता आयपीएलमध्येही संजू राठोडने हे गाणं गायलं होतं. त्यानंतर आता प्रसिद्ध इन्फ्लुएनसर रिकी पाँडनेदेखील रिल बनवली आहे.

रिकी पाँड हा डान्सिंग डॅड म्हणून प्रसिद्ध आहे. तो सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडिओ बनवत असतो. अनेकजण त्याचे व्हिडिओ पाहून दुसरे व्हिडिओ बनवतात. रिकीने आता गुलाबी साडी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. त्याने व्हिडिओत गुलाबी साडी गाण्यावर मस्त डान्स केला आहे. प्रत्येक स्टेप अगदी हुबेहुबे करताना दिसत आहे.

ricky.pond या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मराठी गाण्याची भूरळ आता जगभरात पडतेय. मराठी गाण्यावर परदेशी व्यक्तीचा डान्स पाहून भारी वाटलं, अशा कमेंट्स आल्या आहेत.

संजू राठोडने हे गाण तयार केलं आहे. गुलाबी साडी हे गाणं प्रत्येक लग्नात, कार्यात वाजवताना दिसत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी माधुरी दिक्षित, नेहा कक्कर सर्वांनीच या गाण्यावर रिल्स बनवल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT