Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नातवासाठी काहीपण! चिमुकल्याला हसवण्यासाठी आजोबांचा डान्स; पाहा VIDEO

Viral Video News: सोशल मीडियावकर सध्या एका आजोबांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नातवासाठी त्यांनी काय केले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Viral Video: आपल्यापैंकी प्रत्येकजण आपल्या आजी-आजोबांचा लाडका असेल. घरात आजी-आजोबा असण प्रत्येकाला आवडते शिवाय त्यांच्याकडून लाड पूर्ण करून प्रत्येकजण घेत असतो. कारण आजी-आजोबाशिवाय संपूर्ण घर रिकाम वाटत. सध्या सोशल मीडियावर एका आजी-आजोबाचा सुंदर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात आपल्या नातवाला आजी खावू घालत आहेत तर आजोबा चिमुकल्या नातवासाठी गोंडस असा डान्स करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक आजी(grandma) आणि आजोबा दिसत आहे. मात्र त्यातील त्या आजी त्यांच्या चिमुकल्या नातवाला भरवत आहेत मात्र चिमुकला नातू खात नसल्याचे दिसत आहे. मात्र काही वेळात ते आजोबा नातवाच्या समोर उभे राहून डान्स(Dance) करण्यास सुरुवात करतात, मग काय चिमुकला नातू आजींनी भरवल्यानंतर खाण्यास सुरुवात करतो. सर्व आनंदाचे क्षण घरातील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''_saakshichavan'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''आताच्या काळात खरंच गरज आहे आजीआजोबा घरी असण्याची,कारण मुलांना आईवडील वेळ नाही देऊ शकत तर मूल आजीआजोबानकडे अगदी सुरक्षित असतात'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पोस्ट होऊन काही दिवस काही दिवस झाले असून व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लाईक्स आले आहेत तर व्हिडिओला मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत.

आजी-आजोबांचा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेट्स बॉक्समध्ये आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''खरं आहे'' तर काहींनी नेटकऱ्यांनी लिहिले आहे की,''खूप छान'' तर अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT