Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मैफील जमली! 'दुनिया मे रहना है तो' गाण्यावर आजोबांनी केला जबराट डान्स... व्हिडीओ पाहून टाळ्या वाजवाल!

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हायरल व्हिडिओत काकांचा जबरदस्त डान्स आपल्याला पाहण्यास मिळत आहे.

Tanvi Pol

Old Man Dance Video: वाढते वय असा शब्द आहे की भल्याभल्याना त्या वयात येण्यास आवडत नाही मात्र जीवनाचे अंतिम सत्य आहे. वाढते वय त्यात जर पन्नाशीनंतरचे आयुष्य अनेकांना जगणे कठीण जाते. मात्र या वयात सुद्धा अनेक वयोरुद्ध व्यक्ती आयुष्याचा मनोमुराद आनंद लुटत असतात, त्याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हाला ही येईल. ज्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका ७० वर्षांच्या आजोबांनी मित्रांसोबत धम्माकेदार डान्स केलेला आहे.

व्हायरल (Video) व्हिडिओत तुम्हाला दिसेल की,'' अनेक वयोरुद्ध व्यक्ती ग्रुप बनवून एका ठिकाणी बसलेले आहे. त्यातील काही व्यक्तींचे वय अतिशय जास्त दिसून येत आहे. मात्र त्यातील एक आजोबा दिसून येत आहेत, जे उभे आहेत शिवाय व्हिडिओत पुढे पाहू शकता त्याच काकांनी एका व्यक्तीला मोबाईल देऊन डान्स (Dance) करण्यास सुरुवात करतात कारण सर्व डान्स कॅमेऱ्यात कैद करता येईल. काकांनी केलेला डान्स पाहून तरुणाईला पाठी सोडत आहेत, असा डान्स करण्याचा आजोबांचा उत्साह दिसून येत आहे. या व्हिडिओत काकांनी,''दुनिया मे रहना है तो'' या गाण्यावर डान्स केलेला आहे.

आजोबांचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील असलेल्या ''@kharotevijay'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''दुनिया मे रहना है तो'' असे लिहिण्यात आलेले आहे. डान्स व्हिडिओ हा आजोबांनी त्यांच्या इन्स्टा अकाउंटवरच पोस्ट केलेला आहे शिवाय या अकाउंटवर काकांचे अनेक डान्सचे व्हिडिओत आहेत.

आजोबांचा व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिलेली आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक यूजर्संनी प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''सावध राहा, जुने खेळाडू मैदानात आले आहेत'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''म्हातारपण असावे तर असे''याला म्हणतात आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटणे''अशा अनेक प्रतिक्रिया आजोबांचा डान्स व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT