Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: महिला दिनाचे खास सेलिब्रेशन! मुंबई लोकलच्या डब्यात दिसला उत्साहाचा माहोल; पाहा VIDEO

Mumbai Local Train Video: काल देशभरात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये काही महिला चक्क लोकल ट्रेनमध्ये महिला दिन साजरा करत असताना दिसत आहेत.

Tanvi Pol

Women’s Day In Local Train: मुंबई लोकल म्हणजे फक्त प्रवासाचे साधन नाही, तर अनेक नाती जोडणारे एक अनोखे जग आहे. लोकलमध्ये तासभराच्या प्रवासात रोज सोबत जाणाऱ्या महिला काही दिवसांनी एकमेंकीच्या चांगल्या मैत्रिणी होतात.मग काय ट्रेनमधले हे महिलांचे ग्रुप अनेक सण असो वा वाढदिवस अगदी हळदी-कुंकूही लोकल ट्रेनमध्येत साजरा करताना दिसून येतात.मात्र त्यातही काल काही महिलांनी ट्रेनमध्ये ही या वर्षीचा महिला दिनही साजरा केलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला मुंबई लोकल दिसत असून या लोकलच्या प्रवासात अनेक महिला वर्ग दिसत आहे.या महिलांनी लोकलमध्येच एकत्र येऊन ट्रेनमध्ये महिला दिनानिमित्ताने काही पोस्टर चिकटवत आहेत त्यानंतर प्रत्येक महिलांना काही महिला फुलं देताना दिसत आहे.त्यानंतर सर्वजणी मिळून फोटो काढताता अशा पद्धतीने काही महिलांनी कालच महिला दिन साजरा केला.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच नेटकऱ्यांच्या पसंतील येत आहे.

'5.33_csmt_khopoli' या अकाउंटवर लोकल ट्रेनमधील हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये,''खोपोली ट्रेनमध्ये महिलादिन उत्सव'' असे कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे.व्हिडिओ अपलोड होताच लोकांनी हजारो लाईक्स दिलेले आहे तर लाखोंच्या घरात व्हिडिओ व्ह्यूजही मिळालेले आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

नेटकरी वर्गात हा व्हिडिओ(Video) तुफान व्हायरल झालेला आहे.त्यातील अनेक नागरिकांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''अशीच ऐकजूट ठेवा'' तर दुसऱ्या यजूरने कमेंट केली,''वा मस्त वाटतं बघून, एकत्रित येऊन साजरा केला तूम्ही महीला दिन''तर तिसऱ्या यूजरने हि कमेंट केली,''हे विश्वच वेगळं''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mirchi Bhaji Recipe: हॉटेलसारखी खुसखुशीत मिरची भजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

New Year 2026 Trip : पांढरी वाळू, निळाशार समुद्र, सूर्यास्ताचा नजारा; मुंबईजवळ कॅम्पिंगचे सुंदर लोकेशन

Horoscope: ओळखीचा होणार फायदा, व्यवसायात धनलाभाचा योग; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी खास आहे आजचा दिवस

Hair Oil Benefits: हिवाळ्यात केस गळतीला करा बाय बाय, घरीच बनवा कढीपत्ता, कांदा आणि कोरफडीचा तेल

SCROLL FOR NEXT