Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आता लग्नसमारंभात जेवणाना १० वेळा विचार कराल; कुकचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद; पाहा VIDEO

Ghaziabad Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका लग्नातील संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे.जो पाहिल्यानंतर तुम्ही बऱ्याचदा लग्नात जेवणाता विचार कराल.नक्की काय घडले ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Wedding Food Controversy Video: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे.या घटनेत एका लग्नातील कार्यक्रमात जेवण तयार करणाऱ्या कुकने रोटी बनवताना त्यावर थुंकल्याचा प्रकार घडला आहे.जो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.हा लग्नातील प्रकार पाहिल्यानंतर बऱ्याचजणांनी संताप व्यक्त केला असू पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतलेली आहे.

नेमके काय घडले?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम दिसून येत आहे.अशात या कार्यक्रमातील आलेल्या काही जण जेवणाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी गेले आणि तिथे लपून व्हिडिओ शूट केला ज्यात एक कुक रोटी करताना दिसत आहे.मात्र त्यानंतर तो त्यावर थुंकतानाही दिसत आहे.हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण घटना गाझियाबादच्या एका लग्नातील आहे शिवाय व्हिडिओ व्हायरल होताच स्थानिक पोलिसांनी त्या कुकला अटक केलेली असून चौकशी सुरु आहे.सध्या हा व्हिडिओ ''@SachinGuptaUP'' या एक्स मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे.गाझियाबादमधील या घटनेमुळे नेटकरी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली असून अशा घटनांमुळे खाद्यसुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळाले आहे तर अनेक लाईक्स आणि प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''आता लग्नात जेवायला जायच का नाही'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''असे व्हिडिओ नका दाखवत जाऊ'' तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''खुप धक्कादायक आहे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT