Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आधी हात जोडून नमस्कार केला, मग एक मराठा, लाख मराठा घोषणा दिल्या; फॉरेनरने जिंकली सर्वांचीच मने

विदेशी तरूणाने मुंबई महानगरपालिकेसमोर हात जोडून नमस्कार केला. यानंतर "एक मराठा लाख मराठा" अशी घोषणा दिली.

Manasvi Choudhary

मराठा आरक्षणाचा मुद्दा पु्न्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच लढ्यासाठी मनोज जरांगे रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईला आले आहेत. मनोज जरांगेसह लाखो आंदोलनकर्ते देखील सामील झाले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगेचा मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. हातात झेंडे आणि डोक्यावर टोपी घेऊन आंदोलनकर्ते न्याय हक्कासाठी लढत आहे. एक मराठा, लाख मराठा अश्या घोषणा देत आहेत. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

मराठाच्या लढ्यासाठी आंदोलनकर्ते कालपासून मुंबईत रवाना झाले आहेत. मोठ्या प्रमाणात आंदोलनेकर्ते आझाद मैदानात आले आहेत. एक मराठा, लाख मराठा या घोषणा देत आहेत. याचदरम्यान एका विदेशी तरूणाने सर्वांची मने जिंकली आहेत. या तरूणाने मराठा आंदोलनकर्त्यांसह घोषणाबाजी केली आहे. त्याने मुंबई महानगरपालिकेच्या समोर एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या आहेत. सोशल मीडियावर विदेशी तरूणाचा व्हिडीओ नेटकऱ्यांची मने जिंकत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मराठा समाजासाठी आंदोलनकर्ते रस्यावर उतरले आहेत. घोषणाबाजी करत आहेत. दरम्यान एक विदेशी तरूण हातात कॅमेरा घेऊन उभा आहे. त्याने नमस्कार करत एक मराठा, लाख मराठा अशी घोषणा देखील दिल्या आहेत. सोशल मिडियावर या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. अनेकांनी लाईक्स आणि प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026: पावसाने दोन्ही सामन्यांचा निकाल बदलला; भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, फायनलचा महामुकाबला होणार का?

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

SCROLL FOR NEXT