Dog Rescue Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Dog Rescue Video: कुत्र्याला जीव वाचवण्यासाठी आलं हेलिकॉप्टर,अग्निशमन दलाची कौतुकास्पद कामगिरी; VIDEO व्हायरल

Viral Dog Video: कुत्र्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलातील कर्मचाऱ्याने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने थेट वाहत्या पाण्यात उडी मारली असून स्वत:चा जीव धोक्यात टाकला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rescue Dog Viral Video

कुत्र्याला माणसाचा जवळचा मित्र म्हणतात. त्याला तशीच कारणंही असतात. अनेक वर्षांपासून कुत्राला माणसांचा सर्वात विश्वासू मित्र म्हटले जाते. बहुतांशी आपल्याला अनेक घरात कुत्रा पाळलेला दिसून येतो. तो त्यांच्या घरातील एक सदस्य असतो.कुत्र्यालासुद्धा माणसाप्रमाणेच प्रेम लागंत. त्याने आपल्यावर जीव लावला की तो शेवटपर्यंत त्या घरातील प्रत्येकाची काळजी घेतो. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यामध्ये कुत्र्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलातील कर्मचाऱ्याने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने थेट वाहत्या पाण्यात उडी मारली असून स्वत:चा जीव धोक्यात टाकला आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होतेय..('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुत्रा हा एक इमानी प्राणी आहे. अनेक व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्यांना त्याच्यासारख्या लाईफस्टाइल सारखे जगू देतात. कुत्र्यांना नवीन कपडे परिधान करतात तर घरातील लहान बाळांसारखेच त्यांच्या पाळीव कुत्र्याला जपतात. त्या संबंधित अनेकवेळी सोशल मीडियावर अनेकवेळी आपण कुत्र्यांचे असंख्य व्हिडिओ पाहिले आहेत.हे व्हिडिओ पाहताना कधी कधी आपल्याला खूप हसू येत तर काही व्हिडिओ पाहून आपण भावूकही होतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

मिळालेल्या माहितीनुसार,कॅलिफोर्नियातील लॉस एंजिल्स येथे (ता.५) सोमवार रोजी कुत्र्याला वाचवण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या पाण्यात पडलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी भल्यामोठ्या पॅकोईमा वॉशमध्ये उडी मारली होती. त्यादरम्यान अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना सर्व घटना होताना पाहिले त्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कुत्र्याच्या मालकाला तिथेच थांबवून स्वत:हा पाण्यातून वाहत जाणाऱ्या कुत्र्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला दिसते की, अग्निशमन दलाचे हेलिकॉप्टर भल्यामोठ्या वाहत जाणाऱ्या पाण्याच्यावर आहे.त्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने एक अग्निशमन दलाचा कर्मचारी दोरीच्या साहाय्याने पाण्याच्यावर लटकलेला आहे. वाहत्या पाण्यातून कुत्रा वाहत येत आहे.त्याचदरम्यान अग्निशमन दलाचा कर्मचारी आणि त्यांची टीम यांचा कुत्र्याला पाण्यातून वाचवत असतानाचा संपूर्ण थरार सुरु आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील@StoryfulViralया पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पंसतीही मिळत आहे. अनेक यूजर्संकडून अग्निशमन दलाचे भरपूर कौतूक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT