Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Video: विरार लोकलमध्ये तुफान राडा, दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी अन् शिवीगाळ

Mumbai Local Train: सोशल मीडियावर सध्या लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. नेमके काय घडले असेल ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Fighting In Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, त्यातच सध्या एक धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. जिथे धावत्या लोकलमधील दोन प्रवाशांच्या गटात तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण प्रकार हा विरार लोकलमधील आहे. जिथे नेहमी प्रमाणे अनेक प्रवासी कामानिमित्ताने जात असतात. मात्र, या प्रवासा दरम्यान काही जणांचे गट बनले असतात. त्यात ज्या विरार ट्रेनमधून हा प्रवास होत असतो. त्यात प्रवाशांच्या दोन गटात काही कारणावरुन जोरदार बाचाबाचीला सुरुवात होते. परंतू, हा वाद नंतर तुफान हाणामारीमध्ये (Fighting) बदलतो.

लोकल ट्रेन झाली कुस्तीचा आखाडा

प्रवाशांनी भरलेल्या या गर्दी दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे अन्य प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला काही प्रवाशांना त्यांच्या स्टेशनवर उतरताही आले नाही. हाणामारी सुरु असताना काही प्रवाशांनी हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी मोबाईल काढून मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला. सध्या हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर चर्चेचा विषय बनला आहे.

हा व्हिडिओ (Video) सध्या इन्स्टाग्रामवरील hp_live_news या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही तासांतच लाखोंचे व्ह्यूज आणि अनेक लाईक्स मिळत आहे. शिवाय नेटकरी वर्गातून काहींनी संतापजन तर काहींनी गंमतशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

SCROLL FOR NEXT