Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मौत को छूकर टक से वापस! १२० किमीने धावणारी वंदे भारत धडकणारच, तेवढ्यात.. आजोबांचा व्हिडीओ व्हायरल

Viral News: सोशल मीडियावर सध्या एका आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडले असेल व्हायरल व्हिडिओत ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Shocking Viral Video: सोशल मीडिया आपल्याला कायम धक्कादायक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. मग अनेक व्हायरल व्हिडिओ अनेक अपघात घडलेले दिसतात. घडलेल्या अपघातांचे अनेकदा मुळ कारण व्यक्तींचा निष्काळजीपणा असतो. मात्र सध्या असाच एक वयोरुद्ध व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात रेल्वेरुळ ओलांडताना धावत्या ट्रेनच्या धडकेपासून तो व्यक्तीचा जीव वाचतो.सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक स्टेशन दिसून येत आहे. या स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर अनेक प्रवाशी थांबलेले आहे, अशातच एक वयोरुद्द व्यक्ती प्लॅटफॉर्मच्या पलीकडून रेल्वेरुळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर येत असतो. मात्र प्लॅटफॉर्मवर चढण्याच्या आधीच एका बाजून एक ट्रेन येत असते. मात्र काही क्षणाच्या अंतराने व्हिडिओत (Video)दिसणारे वयोरुद्ध व्यक्ती धावत्या ट्रेनच्या धडकेपासून वाचतो. सर्व घटना एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेली आहे.

आजोबांचा व्हायरल व्हिडिओ 'इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@thirumal_king_thirumal_king'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओला काही दिवसात असंख्य व्ह्यूज आणि अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' बापरे काय हे धाडस'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''नको तिकडे असं स्टंट करायला आजोबांना कोणी सांगितले'' तर अनेक यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिता केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT