Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तोरणमाळ घाटात नागरिकांचा धोकादायक प्रवास! व्हिडिओ पाहून अंगावर शहारा येईल

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका घाटातून प्रवाशांचा धोकादायक प्रवास होत आहे. जो व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

Tanvi Pol

Toranmal Ghat News: सोशल मीडियावर आपल्याला दरदिवशी अनेक अपघातांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. व्हायरल होत असलेले अपघातांचे कारण कितेकदा वाहन चालकांचा निष्काळजीपणा असतो, त्यातच सध्या असाच एका धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात वाहनाचा छतावर बसून पर्यकांसोबत स्थानिक विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास होत आहे. सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे.

नेमके प्रकरण काय?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक जीप दिसत आहे. या जीपमध्ये वाहनामध्ये बसण्याच्या क्षमतेपेक्षा मोठ्या पट अधिक प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत. कोणी वाहनाच्या छतावर बसलेले आहे तर काहींजण वाहनाच्या पुढच्या भागात बसलेले आहे. धक्कादायक गोष्ट तर संपूर्ण प्रवास घाटातून करण्यात येत आहे. संपूर्ण व्हिडिओ तेथून जाणाऱ्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ घाटातील आहे. महाराष्ट्रात क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ पर्यटन स्थळांवर गेल्या दोन महिन्यांपासून बस सेवा बंद आहे, मात्र प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना मन मर्जीने जिल्ह्यात अवैध वाहतूक जोरात सुरु आहे, त्यामुळेच १० प्रवासी क्षमता असलेल्या वाहनात चक्क २६ प्रवासी प्रवास करताना दिसून येतात.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो 'saamtv' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर व्हिडिओ व्हायरल होताच बऱ्याच नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केल्या आहेत.

टीप : सध्या व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT