Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कुली नंबर १...ट्रेनमध्ये जागा पकडण्यासाठी शोधला नवीन मार्ग; VIDEO पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल

Funny Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका रेल्वे स्टेशनवरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला अनेक हटके व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. अनेकदा नागरिकांच्या हटके कारनाम्याचे व्हिडिओ असतात जे पाहून पोट दुखेपर्यंत हसायला भाग पडते. सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा असाच काहीसा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात प्रवाशी खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये काही प्रवाशांना एका हमालाने चढवण्यासाठी अनोखा मार्ग शोधून काढलेला आहे. सध्या या व्हिडिओची चर्चा सर्वत्र होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक स्टेशन दिसून येत आहे. या स्टेशनवर एक ट्रेन उभी आहे. स्टेशनवर आलेल्या ट्रेनमध्ये चढताना अनेकजण दिसत आहे. मात्र स्टेशनवर प्रवाशीची गर्दी आहे शिवाय ट्रेनमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी आहे. तुम्ही व्हिडिओत(Video) पुढे पाहिले तर दिसेल की, अनेक प्रवाशी भरलेल्या ट्रेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ट्रेनला मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी आहे. पंरतू तिथे एक हमाल असो जो सुरुवातीस एका महिलेला उचलून एका खिडकीच्या माध्यमातून आत पोहचवतो त्यानंतर एका तरुणाला मग एक एक करत अनेकांना. सध्या या हमालाचे कौतुक प्रत्येक ठिकाणी होत आहे.

स्टेशनवरील व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@HasnaZaruriHai'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मोठ्या संख्येने व्हिडिओला लाईक्स मिळाले असून दरदिवशी व्हिडिओचे व्ह्यूज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे. एवढेच नाही तर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कुली no 1'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''हे भारतातच बघायला मिळू शकत'' तर अनेकांनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT