Chocolate sweet corn Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: काय सांगता....ओरियो बिस्किट पकोडानंतर मार्केटमध्ये आलाय चॉकलेट मका;VIDEO पाहुन नेटकरी संतापले

Food Viral Video: सोशल मिडियावर अनेक फूड संबंधित व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये अनेक पदार्थ एकत्रित करून वेगळा पदार्थ तयार केला जातो. असे व्हिडिओ तूफान व्हायरल होत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chocolate sweet corn Video

पावसाळ्याच्या दिवसात गरमा गरमा भाजलेला मका खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना भाजलेला मका खायला आवडतो. भाजलेल्या मक्याच नाव जरी काढलं तरी अनेकांच्या तोडांला पाणी सुटतं. आपण कायम मीठ,मिरची तसंच मसाल्यांसोबत भरपूर भाजलेला मका खाल्ला आहे. परंतु तुम्ही कधी चॉकलेट मका खाल्ला आहे का? सध्या सोशल मिडियावर असाच एका चॉकलेट मका विकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चॉकलेट मका...

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती तिथं असलेल्या बॉक्समधील एक मका काढते. त्यानतंर पेपर डिशमध्ये ठेवते. सुरुवातीला मक्यावर भरपूर बटर लावले जाते तसंच चॉकलेट सिरप सर्व बाजूंनी लावले जाते. मक्यावर पांढऱ्या रंगाचा एक पदार्थ टाकून त्यावर अनेक प्रकारचे मसाले टाकून शेवटला लिंबू पिळला जातो. मग तयार केलेला चॉकलेट मका खाण्यासाठी एका व्यक्तीला दिला जातो.

चॉकलेट मक्याचा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवरील

@Ashu_journlist या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मॅगीनंतरची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे चॉकलेट कॉर्न.'सोशल मिडियावर अनेक फूड संबंधित व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये अनेक पदार्थ एकत्रित करून वेगळा पदार्थ तयार केला जातो. असे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. त्यात कधा चॉकलेट मॅगी तर कधी चिकन पाणीपुरी तयार केली जाते.

व्हायरल व्हिडिओ दिल्लीचा असल्यांच समजतंय

व्हायरल व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत असंख्य व्ह्यूज मिळाले आहेत. व्हायरल व्हिडिओवर कमेंटस् करत एका यूजरने लिहिलं आहे की, भाऊ, आता खाणार नाही असे वागू नकोस'. तर आणखी एका यूजरने लिहिलं आहे की,एक दिवस आपण हे खाऊन मरणार आहोत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT