Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शाब्बास रं पठ्ठ्या! धावत्या स्कुटीवर पूर्ण केला अभ्यास, चिमुकल्याचा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका चिमुकल्याचा अभ्यास करताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र चिमुकला कोणत्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी बसला आहे जे पाहून संताप होत आहे.

Tanvi Pol

Shocking Viral Video: शाळेतील जुने दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय खास होते. शाळेती धम्माल-मस्ती पुन्हा मोठे झाल्यावर करता आली नाही, मात्र शाळेतील एक खास आठवण म्हणजे अपूर्ण राहिलेल्या गृहपाठामुळे मिळालेला शिक्षकांचा मार. मग अनेकांना पूर्ण तास वर्गाबाहेर राहावे लागत असे किंवा मित्रांच्या मदतीने गृहपाठ आपण पूर्ण करत असो. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एक चिमुकला शाळेत जात असताना धावत्या स्कुटीच्या पाठी बसून अभ्यास पूर्ण करताना दिसत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एक महिला स्कुटी चालवत आहे. त्याच रस्त्यावरुन अनेक वाहनांची ये-जा होत आहे. मात्र व्हिडिओतील त्या महिलेच्या स्कुटीकडे पाहिले तर स्कुटीच्या पाठीमागे महिलेचा लहान मुलगा बसलेला आहे आणि महिलेच्या पुढे एक लहान मुलगी उभी आहे, मात्र जो लहान मुलगा पाठी बसलेल आहे तो चक्क पाठीमागे बसून एका वहीमध्ये काही तरी लिहिताना दिसत आहे. अर्थात शाळेतील राहिलेला अभ्यास तो शाळेत जाता जाता पूर्ण करताना दिसत आहे. सर्व धक्कादायक प्रसंगाचा व्हिडिओ(Video) त्याच रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@HasnaZaruriHai'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यासोबत कॅप्शनमध्ये,''हे मूल एक दिवस नक्कीच त्याच्या आईला अभिमान वाटेल असे काम करणार आहे''. एवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या पंसतील आलेला आहे. मात्र अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर काही नेटकऱ्यांनी गंमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT