Viral Video Of Chain Snatching Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video Of Chain Snatching: चोरीचा हास्यास्पद प्रयत्न, पण शेवट झाला गजब, व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Viral Video Of Chain Snatching: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल आहे. चोराचा चैन चोरीचा डाव फसला आणि त्याने महिलेकडे हात जोडून माफी मागितली. नेटकऱ्यांकडून यावर जोरदार प्रतिक्रिया मिळत आहेत.

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये चोरीच्या घटनाचे व्हिडीओ देखील असतात. चोरी करताना चोर अनोखी शक्कल लढवताना दिसतात मात्र यामुळे ते कधीकधी फसले देखील जातात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या चोरी करणाऱ्या तरूणाने डाव फसल्यानंतर महिलेंची हात जोडून माफी मागितली आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मुलगा दिसत आहे. त्याने तोंडाला मास्क लावलेला आहे. डोक्यात देखील हेल्मेट घातलेला आहे. चोरी करण्यासाठी त्याने हे केल्याचं चित्र दिसत आहे.एक महिला रस्त्यावरून चालत असताना हा मुलगा तिच्या गळ्यातील चैन चोरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र महिलेच्या गार्भींयतेमुळे चोराचा हा डाव चांगलाच फसला आहे.

चोर महिलेच्या मागून तिच्यागळ्यातील चैन खेचण्याचा प्रयत्न करत आहे. चोराने महिलेच्या गळ्यातील चैन तोडली असली तरी तो हिसकावू शकला नाही. यानंतर महिलेने या मुलाला चांगलच झापलं आहे. या चोराने महिलेची माफी मागू हात जोडले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

चोर एवढं झाल्यानंतर पळून गेला नाही तर त्याने माफी मागून महिलेकडे पैसे मागितले. घाबरलेल्या या महिलेने लगेचच या चोराला पैसे दिले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pooja Name Meaning: पूजा नावाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?

Maharashtra Live News Update: येणाऱ्या सहा महिन्यात मोदी सरकार दिसणार नाही- कॉंग्रेस नेते सुनिल केदार

Aishwarya Narkar: कॉटन साडीत खुललं ऐश्वर्या नारकरचं सौंदर्य

Solapur Tourism: सोलापूरजवळ वसलंय स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन; लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं

Maratha Reservation Controversy: हा जीआर फक्त कागद; मराठा आरक्षणावर विनोद पाटील यांची जोरदार टीका|VIDEO

SCROLL FOR NEXT