Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भटके कुत्रेच नाही तर मोकाट रेडासुद्धा पिसाळला; बाईकवाल्याला ढुशी देऊन रस्त्याच्या पलीकडेच फेकला

Viral Video Of Buffalo: रस्त्यावर प्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर वावर करणाऱ्या अनेक प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Buffalo Attack On Bike Rider Video Viral:

रस्त्यावर प्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्राणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर वावर करणाऱ्या अनेक प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एका रेड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest News)

व्हायरल व्हिडिओत रस्त्यावर एका रेड्याने मोटारसायकल चालवणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केल्याचे दिसत आहे. व्हिडिओत एका रस्त्यावर ट्राफिक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहे. याचे कारण म्हणजे रेडा. रस्त्याच्या मधोमध एक रेडा उभा असल्याचे दिसत आहे.

रस्त्याच्या मध्ये उभा असलेला रेडा अचानक एका बाजूने येणाऱ्या एका मोटरसायकल चालकावर धावून जातो आणि हल्ला करतो. तो त्या व्यक्तीला दुचाकीवरुन धक्का देऊन खाली पाडतो. त्यानंतर त्याच्यावर हल्ला करतो. त्यावेळी तेथे उपस्थित असणारे इतर लोक त्याच्या मदतीला धावून गेले. तर तो रेडा पुन्हा धावत इतर लोकांच्या मागे लागतो तेव्हा इतर लोक जीव मूठीत तेथून पळ काढतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ghar Ke Kalesh या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'रस्त्यावर फिरणेदेखील धोक्याचे', ' अत्यंत खतरनाक' अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT