Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरर्र...! बैलाच्या कानाजवळ ताशा वाजवायला गेला अन् फजिती करून बसला; तरुणाला घडली चांगलीच अद्दल, पाहा VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या पुन्हा एकदा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जो पाहून नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस पडलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज जगभरातील अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. या व्हिडिओत अनेकदा प्राण्यांचे गमतीदार तर कधी थराराक प्रसंग नेटकऱ्यांना पाहण्यास मिळतात. अनेकदा प्राण्यांच्या या व्हिडिओमध्ये व्यक्तीकडून प्राण्याना हाणी होते तर अनेकदा प्राण्यांकडून व्यक्तींना नुसकान होते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात एका व्यक्तीला बैलाच्या बाजूला उभं राहून जोर जोरात ताशा वाजवणं अंगलट आलेले आहे. सोशल मीडिया जिकडे तिकडे याच व्हिडिओची चर्चा होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ(Video) तुम्ही पाहू शकता की, एका परिसरात एखादा कार्यक्रम पार पडत आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथे एक बैल (Bull) देखील तु्म्हाला दिसून येत आहे. या बैलाजवळ अनेक व्यक्ती उभे आहेत शिवाय एक व्यक्ती आहे जो बैलाच्या अगदी जवळ उभा राहून जोर जोरात ताशा वाजवत असतो. मात्र जोर जोरात वाजणाऱ्या ताशाच्या आवाजाने बैलाला त्रास झाला असेल त्यामुळे बैल दुसऱ्या क्षणाला ताशा वाजवणाऱ्या व्यक्तीला अतिशय जोरात लाथ मारतो. भल्यामोठ्या बैलाची लाथ बसताच व्यक्ती जोरात लांब पडतो. हा सर्व प्रसंग पाहून आजूबाजूची असलेली जनता शॉक होते.

बैलाचा आणि व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''mngeshddii '' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. इतकेच नाही तर व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''बैलाला ध्वनी प्रदुषणाचा त्रास झाला .त्याने आपल्या पद्धतीना उपाय केला'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ शेअर होताच तब्बल ५० हजारपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स तर अजूनही व्हिडिओ पाहिला जात आहे.

प्रतिक्रिया

व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी व्हिडिओ दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला आहे. शिवाय अनेक गमतीदार प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' काय गरज होती का याची'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' एक नंबर असचं पाहिजे'' तर अनेकांनी हसण्याचे इमोजीस् कमेंट्सबॉक्समध्ये दिलेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT