Fighting Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Bengaluru: महिला प्रवासी आणि बस चालकामध्ये तुफान राडा, रस्त्याच्या मधोमध थांबून एकमेकांना धू धू धुतलं, पाहा VIDEO

Fighting Video Viral : बेंगळुरूमधील बीएमटीसी बसमध्ये महिला प्रवासी आणि बस ड्रायव्हर यांच्यात तुफान हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवाशांना बसमधील गोंधळामुळे त्रास सहन करावा लागला.

Manasvi Choudhary

ट्रेनमध्ये असो किंवा बसमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी होण्याच्या घटना कायमच घडत असतात. अशातच आता बेंगळुरूमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका बसमध्ये ड्रायव्हर आणि महिला प्रवासी यांच्यामध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या मारामारीच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बेंगळुरूमधील तुमकुरू रोड येथील बीएमटीसीच्या बसमध्ये ही घटना घडली आहे. बसमध्ये महिला प्रवासी आणि ड्रायव्हरमध्ये सुरूवातीला शा‍ब्दिक बाचाबाची झाली. बाचाबाचीनंतर या दोघांनीही एकमेकांना मारहाण केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बस ड्रायव्हर आणि महिलेमध्ये बाचाबाची सुरू आहे. नंतर दोघांनीही एकमेकांना मारहाण केली आहे.

महिला ही मागच्या सीटवर चढून ड्रायव्हरशी भांडताना दिसत आहे. नंतर ती त्याला मारते. ड्रायव्हर देखील महिलेशी भांडताना दिसत आहे. या ड्रायव्हरला त्याच्या शेजारी असलेले लोक थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. तरी देखील तो थांबत नाही. यानंतर महिलेचा राग अनावर होतो आणि महिला बस ड्रायव्हरच्या कानाखाली मारत आहे.

सोशल मीडियावर हा भांडणाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. सार्वजनिक ठिकाणी झालेला हा वाद यामुळे बसमधील इतर प्रवाशांना देखील याचा त्रास झाला आहे. अनेकांनी या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला तरी देखील हे दोघे थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. या दोघांमध्ये वाद नेमका कशामुळे झाले हे कारण स्पष्ट झाले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यात आज पुन्हा मुसळधार पाऊस

Accident : भीषण अपघात! ट्रक-टँकरची जोरदार धडक, टँकरखाली दबून सासू-जावयाचा दुर्दैवी अंत

Kolhapur Tourism : कोल्हापूरमधील छुपा धबधबा, इथं जाताच येईल फॉरेनचा फिल

Viral : पेट्रोल पंपावर दोन गटात तुफान राडा, VIDEO व्हायरल

GST Discount: दसऱ्याला घरी आणा कार; GST कपातीनंतर टाटाच्या या कारवर धमाकेदार डिस्काउंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT