Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: क्या बात! चंद्रा गाण्यावर थिरकले काका अन् काकू; Video पाहून नेटकरी म्हणाले..एक एक क्षण जगता आले पाहिजे

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका काकांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

सोशल मीडियावर कायम अनेक वयोगटातील नागरिकांचे डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कधी अनेकजण डान्स करण्यासाठी लाजत असतात तर कधी बेधुंद होऊन डान्स करत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एका डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एका कार्यक्रमादरम्यान एका काकांनी जबरदस्त डान्स केलेला आहे.

व्हायरल(Video) होत असलेला व्हिडिओत एक कार्यक्रम दिसत आहे. ज्या कार्यक्रमात अनेक वयोगटातील सदस्य दिसत असून दरम्यान एक काका आहेत मराठी गाण्यावर डान्स करत आहेत एवढेच नाही तर काकांसोबत एक काकी आहेत ज्याही त्यांच्या तोडीस तोड डान्स करताना दिसत आहे. दोघांचा डान्स (Dabce)तेथील एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''indianfestivalandevents'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तब्बल ३४ हजार नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहेत तर व्हिडिओचे व्ह्यूज दिवसेंदिवस वाढत आहेत.

सोशल मीडियावर यापूर्वी या काकांचे डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. सध्या व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''टॉपचा विषय काका'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''कामत काका नादखुळा माणूस'' शिवाय अजून एका यूजरने लिहिले आहे की,''हेय पेक्षा बजूचा काका हार्ड ये'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कॉक्रोच जनता पार्टीची ५ आणि ६ ऑगस्ट रोजी रणनीती बैठक

Fashion Tips : स्किन टोननुसार हेअर कलर कसा निवडावा? जाणून घ्या परफेक्ट शेड्स

दररोज मेथीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते का?

LPG Gas KYC Update : १० दिवसात e-KYC करा, अन्यथा सिलिंडर दुपट्टी दराने करावा लागेल खरेदी, वाचा नियम

Actor in Old Age Home: १०० चित्रपटात काम केलं; पण आज अभिनेत्याकडे औषधांसाठीही पैसे नाहीत, वृद्धाश्रमात काढतायेत दिवस

SCROLL FOR NEXT