Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाई गं... बायको माहेरी गेली अन् नवऱ्यानं रिक्षात लावलं हटके पोस्टर; Viral Video पाहून हसू आवरणार नाही

Auto Driver Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका रिक्षा चालकाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ असे काही आहे जे पाहिल्यानंतर तुम्ही प्रचंड हसणार आहात.

Tanvi Pol

Funny Auto Poster: नवरा-बायकोचं नातं कायम अन्य नात्यांपेक्षा वेगळं दिसून आलं आहे.त्यातही नवऱ्याच बायकोवर जास्त प्रेम असल्यास तो तिच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी हटके गोष्टी करत असतो.मात्र काही कारणामुळे दोघांमुळे विरह आला तर तो तिला खूप मिस करतो.मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ अशाच एका नवऱ्याचा आहे,मात्र ज्यात त्याची बायको माहेरी गेल्यामुळे खूष झाला आहे,ज्यामुळे त्याने जे केलं आहे ते पाहून तुम्हीही तुमच्या डोक्याला हात लावाल.''बायको माहेरी गेली आहे. मी आनंदी आहे'

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक रिक्षा दिसून येत आहे.ज्यात रिक्षाच्या आतील बाजूस भागास एक पांढऱ्या रंगाचा कागद चिटकवला आहे आणि त्यात इंग्रजीमध्ये,''बायको माहेरी गेली आहे आणि मी आनंदी आहे'',असे लिहिले आहे.सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले आहे.

सोशल मीडियावर यापूर्वी रिक्षाच्या पाठी लावलेले मजेशीर अनेक पोस्टर व्हायरल झालेले आहे.मात्र सध्याचा हा पोस्टरचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील '_epic69'या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओला तीन दिवसांतच १० हजारपेक्षा अधिकचे लाईक्स मिळाले आहेत तर लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

पोस्टर वाचल्यानंतर ते नेटकऱ्यांच्या प्रचंड पंसतील पडलेले आहे शिवाय यावर नेटकरी वर्गाने कमेंट बॉक्समध्ये विविध प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''भावा नक्की मार खाणार तु'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट (Comment) केली आहे,''हे तुझ्या बायकोने पाहिलं का?''अशा अनेक गंमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: रिक्षाचालकाचा अनोखा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardamom Benefits: जेवणानंतर दररोज खा वेलची; शरीरात होतील 8 बदल, अपचनाचाही त्रास होईल कमी

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

SCROLL FOR NEXT