Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: चहावाला काही करु शकतो.. चक्क नव्याकोऱ्या बाईकची जेसीबीतून वरात, ६० हजार घालवले अन् हौस भागवली, पाहा Video

Funny Viral Video: सोशल मीडियावर एका नवीन वाहन खरेदी केलेल्या व्यक्तीने चक्क मिरवणूक काढलेली आहे. मात्र या मिरवणूकीत काय खास आहे हे तुम्ही व्हायरल व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Viral Video NewsL: नवीन वस्तु घेतल्यानंतर प्रत्येकाला आनंद होतो. मात्र जर आपण मेहनत करुन आणि अत्यंत आवडीची शिवाय अत्यंत महागडी वस्तू घेतल्याचा आनंद फार वेगळा असतो. सध्या सोशल मीडिया एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्याने एक बाईकची खरेदी केल्यानंतर चक्क जेसीबीने त्याची मिरवणूक काढलेली आहे मात्र यासाठी त्या व्यक्तीने ६० हजार रुपयांचा खर्च केलेला आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होत आहे.

व्हायरल (Viral) असलेल्या व्हिडिओ तुम्हाला अनेक व्यक्तीचा ग्रुप रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. मात्र व्हिडिओत पुढे पाहिले तर एक जेसीबी दिसून येत आहे. मात्र त्या जेसीबीला एक बाईक बांधलेली आहे. व्हिडिओ पाहून असं दिसत आहे की बाईकची (Bike) वरात काढत आहे. मात्र व्हायरल व्हिडिओवर काही वाक्य लिहिली आहेत त्यावरुन समजते नक्की व्हिडिओ कशा संदर्भात आहे. व्हिडिओवर लिहिले आहे की,''चाय वाला कुछ भी कर सकता है'' आणि लिहिले आहे की,''बाइक लेने DJ से शोरूम पहुंचा चाय वाला ! 60 हजार जुलूस में खर्च कर दिए ! 20 हजार डाउन पेमेंट जमा करके लाया !'' असे लिहिले आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील '@pappu.com_mondol' .या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ एका दिवसापूर्वी इन्टाग्रावर शेअर करताच हजारोंच्या संख्यने व्हिडिओला लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' भावाच्या आवाजाला तिसरा हात सलाम'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''लोक काय करतील सांगता येत नाही'' तर बऱ्याच यूजर्संनी हसणाच्या प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT