Shocking Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: अरे बापरे! जत्रेच्या पाळण्यात तरुणाचा जीवघेणा स्टंड; VIDEO पाहून बसेल धक्का

Viral Video: सोशल मीडियावर कायम स्टंट करण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात सध्या एका तरुणाचा यात्रेतील पाळण्यात स्टंट करताचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

Tanvi Pol

Young Man Stunt Video:देशभरात नुकताच नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. नवरात्री निमित्ताने देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या संख्येने कार्यक्रम पार पडले शिवाय अनेक ठिकाणी जत्राही भरल्या. जत्रेत आपल्याला अनेक नवीन गोष्टीसह मोठ-मोठे पाळणे पाहण्यासाठी मिळतात. प्रत्येकजण यात्रेत पाळण्यात बसण्यासाठी येत असतो. मात्र यात काही तरुण असे असतात की जे फिरत्या पाळण्यातही स्टंटबाजी करत असतात. त्यासंबंधित एक यात्रेमधील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात फिरत्या पाळण्यात एका तरुणाने धोकादायक स्टंट केलेला आहे. सध्या सर्वत्र तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहु शकता, सर्वत्र मोठ-मोठे पाळणे दिसून येत आहेत. त्यात जत्रेत आलेल्या एका व्यक्तीने तिथेली व्हिडिओ कॅमेऱ्याक कैद केलेला आहे. या व्हिडिओत एक पाळणा दिसून येत आहे. मात्र व्हिडिओ तुम्ही बारकाईने पाहिला तर दिसेल की, जो पाळणा आहे तो अत्यंत वेगाने आणि अति उंचावर झेप घेत आहे. या पाळण्यात अनेकजण बसलेले आहेत. मात्र त्यात एक तरुण आहे जो या पाळण्याच्या टोकाशी उभा राहून स्टंट(Stunt) करत आहे. जो स्टंट त्याच्यासाठी अत्यंत जीवघेणा असून धोकादायकही आहे.

स्टंटचा व्हिडिओ 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो एक्सवरील '@priyarajputlive' या पेजवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. एवढच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''याच्यावर कारवाई करावी'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' काय कराव यांच'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' काय करतीस सांगता येत नाही'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; कायदेंकडून पदाचा तडकाफडकी राजीनामा

इंजेक्शन लावून सफरचंद विक्रीचा आरोप, चौकशीत निर्दोष सापडला; आता विक्रेत्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ

Maharashtra Live News Update: जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न - सुनेत्रा पवार

8 व्या वेतन आयोगाआधी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, होळीच्या आधी गुड न्यूज

ICC T20 WC: सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला सुपर८चे किती सामने जिंकावे लागतील? समजून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT