Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: देव तारी त्याला कोण मारी! काही सेंकदाने वाचला मजूराचा जीव; नेमके काय घडले ते पाहून येईल अंगावर काटा

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओ नशिब म्हणजे काय हे समजते.

Tanvi Pol

Viral Video News: सोशल मीडियावर आपल्याला दररोज अनेक घडलेल्या घडनांचे अपडेट मिळत असतात. मग घटना जगाच्या कोणत्याही गावात किंवा शहरात घडलेली असो. मग कधी कोणत्या घटना अतिशय भितीदायक असतात तर कधी हैराण करणाऱ्या असतात. मात्र दर दिवशी अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतात हे नक्की सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, जो व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल की नशिब म्हणजे नक्की काय असतं? चला तर पाहूयात नेमके काय घडले असेल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक मोकळा रस्ता दिसून येत आहे. या रस्त्याच्या एका कडेला एक सामानाने भरलेला ट्रक आहे. मात्र या ट्रकमध्ये जे सामान आहे ते सामान एक व्यक्ती खांद्यावर उचलून घेऊन जात आहे. जर तुम्ही पाहिल तर दिसेल की तो व्यक्ती एका लहानशा फळीवर चढून सामान ट्रकमध्ये ठेवत आहे. तो व्यक्ती त्याचे काम करत असताना तो फळीवर एक मोठी गोणी घेऊन चढत असतो, मात्र अर्धात त्या व्यक्तीचा तोल जाऊन तो रस्त्यावर पडला जातो. मात्र काही सेंकदाने रस्त्यावरुन भरधाव वेगात एक ट्रक जातो. मात्र नशिबाने तो व्यक्ती ट्रकच्या खाली येण्यापासून वाचतो. सर्व घटना जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@balumama__bhakt_official'' या अकाउंटवर काही दिवसापूर्वी पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''नशिब'' असे लिहिण्यात आलेले आहे. सोशल मीडियावर या पूर्वीही असे अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांना पाहण्यास मिळाले आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर तब्बल १० हजारहून यूजर्संनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहे तर अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''देव तारी त्याला कोण मारी'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''बगून पोटात गोळा आला रे बाबा'' अशा अनेक प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT