Snake Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: बरेच दिवस घरात विचित्र आवाज येत होते, सीलिंग तोडल्यानंतर सापांचा ढीगच खाली पडला, थरकाप उडवणारा व्हिडिओ

Snake Viral Video: एक भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात चक्क घरात एक दोन नाही तर सापाचा झुंड आढळून आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video Snake In Home

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ हा मनोरंजनाचा विषय असला तरी काही व्हिडिओ पाहून धडकीच भरते. जंगलासह आसपासच्या परिसरात सापांचा वावर हमखास पाहायला मिळतो. नाग, साप, किंग कोब्रा यांच्या एकाच दंशाने व्यक्तीचा मृत्यू होतो. घरात, रस्त्यांवर किंवा एखाद्या झाडावर साप फिरत असल्याचं तुम्ही कधीनाकधी पाहिलंच असेल.असाच एक भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात चक्क घरात एक दोन नाही तर सापाचा झुंड आढळून आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडिओत काय आहे?

व्हायरल होत असलेल्या या सापाचा व्हिडिओ खूपच भयंकर आहे. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, एका घरातील सीलिंग छोडेसे तुटलेले आहे तसेच घरात काही व्यक्ती जमा झालेले आहेत. घरातील सदस्य आपल्याला स्लॅपमधून साप काढताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून सुरुवातीस वाटते की एक साप सीलिंगमध्ये आढळून आला आहे.

मात्र व्हिडिओ शेवट पाहून अगांवर कापर भरल्याशिवाय राहल्याशिवाय राहणार नाही.तर व्हिडिओच्या शेवटी एक व्यक्ती साप काढत असतो पण एका सापासोबत सापांचा झुंडच घरातील जमिनीवर कोसळतो. भल्यामोठ्या आणि एवढ्या जीवंत सापांना स्वता:च्या जवळ पाहून घरातील सदस्य घाबरुन ओरडू लागले.

व्हायरल सापांचा व्हिडिओ प्लॅटफॉर्म एक्सवरील@internet0Fया (ट्वीटर )पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. भयंकर सापाचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. परंतू हा व्हिडिओ पाहून अंगावर शहारे येतील असा आहे. व्हायरल व्हिडिओवर हजारोंच्या घरात कमेंट आल्या असून लाखोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून अनेक यूजर्स अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर या व्हिडिओला शेअर करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Awareness : चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीवर पाणी शिंपडणे पडू शकतं महागात, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींची गोव्यात सभा

Naag or Naagin : नाग की नागीण? कसं ओळखाल?

Green Tea Vs Black Tea: ग्रीन टी की ब्लॅक टी? आरोग्यासाठी काय बेस्ट?

Baramati : बारामतीत भीषण दुर्घटना! विहिरीच्या खोदकामावेळी दडी कोसळून 2 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT