Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: लोकलच्या गर्दीत दिसला स्पायडरमॅन; video पाहून नेटकरी म्हणाले,'' बाबा काम तरी काय तुझ''

Mumbai Local Train: सोशल मीडियावर मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या हाणामारीचे व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात मात्र सध्या लोकल ट्रेनमधील अनोखाच व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

Tanvi Pol

Spiderman spotted in Local Train: स्पायडरमॅन हा लहान मुलांपासून ते अनेक तरुणाईमध्ये असलेला प्रसिद्ध आणि आवडीचा असलेला कार्टून कैरेक्टर आहे. लहानपासूनच अनेक कार्टून आपण पाहत आलेलो आहोत मात्र सर्वात जास्त कार्टून हे स्पायडरमॅनवर आधारित पाहिले आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून मुंबई सर्वत्र एक स्पायडरमॅन दिसून येत आहे. सोशल मीडियावर यासंबंधिक एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात चक्क मुंबई लोकलमधून प्रवास करताना स्पायडरमॅन दिसून आलेला आहे. सध्या सोशल मीडियावर स्पायडरमॅनचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, लोकल ट्रेन आहे ज्यात अनेक प्रवाशांची मोठी गर्दी आहे. लोकलच्या दरवाज्यात अनेक प्रवाशी थांबलेले आहेत तर काही बसण्यासाठी जागा न मिळाल्याने उभे आहेत, मात्र जर व्हिडिओ नीट पाहिला तर दिसेल की, ज्यांना जागा न मिळाली आहे त्यामध्ये चक्क स्पायडरमॅन ही आहे. जो प्रवाशांच्या सीटच्या बाजूला उभा आहे. या स्पायडरमॅनला पाहून लोकल ट्रेनच्या डब्ब्यातील अनेक प्रवाशी(Passenger) हैराण झालेले आहेत. मात्र त्यामधील एका प्रवाशाने हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करुन सोशल मीडियावर शेअर केलेला आहे.

स्पायडरमॅनचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असून तो इन्स्टाग्रामवरील '@karanx.24' या अकाउंटवर १६ तासापूर्वी पोस्ट करण्यात आलेला असून कॅप्शनमध्ये,''स्पायडरमॅन ठाणे स्टेशन दरम्यान लोकलमध्ये दिसून आला'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर व्हिडिओला मोठ्या संख्येने लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

स्पायडरमॅनचा व्हिडिओ प्रत्येक यूजर्संला प्रचंड आवडलेला असून बऱ्याच प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' हा भाऊ कुठे पण जात आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''मज्जा आहे या भाऊची'' तर आणखी अशा अनेकांनी गमतीदार प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Scheme: महाराष्ट्र सरकारची खास योजना! या नागरिकांना मिळतात ₹३०००; अटी काय? वाचा सविस्तर

Nitish Kumar: मुख्यमंत्र्यांनी दिला आमदारकीचा राजीनामा! मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार?

Bigg Boss Marathi 6 : "लांब व्हा..."; बिग बॉसचा पारा चढला; 'तिकीट टू फिनाले'साठी २ सदस्यांनी घरात घातला राडा | VIDEO

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

New Labour Law: १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा; पगार होणार कमी; PF, ग्रॅच्युटीमध्येही बदल

SCROLL FOR NEXT