Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: खेळताना बाई रंग होळीचा गाण्यावर आजोबांनी धरला ठेका, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले....

Old Man Dance Video: आजवर आपण अनेक वयोरुद्ध व्यक्तींचे डान्स व्हिडिओ पाहिले. मात्र, सध्या पुन्हा एकाद आजोबांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काल संपूर्ण राज्यात गणेश विसर्जनाची धामधूम पाहायला मिळली. पुणे नाही तर मुंबईसह सर्वत्र भाविकांची मोठी गर्दी लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी जमली होती. या मिरणुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झालेले आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावरही एका गावातील कार्यक्रमामधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यातील एका वयोरुद्ध आजोबांचा डान्स व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ आजोबांचा या वयातही डान्सचा उत्साह पाहून हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक लावणीचा कार्यक्रम असलेला दिसतोय. संपूर्ण परिसरात अनेक पुरुष मंडळी जमिनीवर बसलेले आहेत. काही वेळातच या खाली बसलेल्या व्यक्तींमधून एक वयोरुद्ध आजोबा उभे राहतात आणि लावणीच्या माहोलमध्ये रंगून डान्स (Dance) करु लागतात. आजोबांना (Old Man) पाहून सर्व नागरिक हसू लागतात तर काहीजण आजोबांचा डान्स मोबाईमध्ये कैद करतात. मात्र व्हिडिओ (Video) कुठल्या गावातील आहे हे समजू शकलेले नाही.

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''janardan_bhangar'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ एका दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर तब्बल ३० हजारहून अधिक यूजर्संनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहे तर व्हिडिओ पाहणारा यूजर्स वर्गही अधिक आहे.

व्हिडिओ पाहणाऱ्या शिवाय व्हिडिओला अनेकांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''नाद बाकी काही नाही'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''बाबांचा व्हिडिओ आजीपर्यंत जाऊ द्या'' तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''मामा आता 8 दिवस वरण भातावर झोपणार वाटतं'' अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया अनेक यूजर्संनी केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT