Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! धावत्या कारला लटकून महिलेची जीवघेणी स्टंटबाजी; VIDEO पाहून नेटकरी भडकले

Lucknow Video: सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेकजण नको ते जीवघेणे स्टंट करत असतात,ज्यामुळे अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात तसेच अनेकदा काहींना जीव गमवावा लागतो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Stunt Viral Video

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेकजण नको ते जीवघेणे स्टंट करत असतात,ज्यामुळे अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात तसेच अनेकदा काहींना जीव गमवावा लागतो.सध्या अशाच एका भयंकर स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात एक तरुणी भरधाव वेगात जाणाऱ्या कारच्या दरवाजाला पकडून थांबलेली असून कारचालकानेही तिला एका हाताने पकडलेले दिसत आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ लखनऊमधील (Lucknow)असल्याचे समजते.

सोशल मीडियावर (Social Media)सध्या एका महिलेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये कार चालकाच्या दरवाज्यावर एक तरुणी दरवाजाला चिकटून उभी राहिलेली आहे. त्यातच चालक एका हाताने कारचे स्टेंरिंग पकडून दुसऱ्या हाताने त्या महिलेला पकडलेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कारचा वेगही जास्त आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या गाडीच्या पाठील बाजूस वकिलांची ओळख पटवून देणारे स्टीकर लावलेले दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर पोलिसांनी कारवाई करावी असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा फक्त एक स्टंट आहे की अन्यथा काही वेगळे आहे,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कारची नंबर प्लेट असल्याने गाडीची ओळख पटवता येईल. दरम्यान@meevktया अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया करत अनेकांनी अनेकांनी कडक कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओची पोलिसांनी दखल घेतली असून लखनऊ पोलिसांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली आणि माहिती दिली की या संदर्भात आवश्यक कार्यवाही करून चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT