Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कोंबडा आणि कुत्र्याच्या भांडणात कोण जिंकलं? एकदा पाहाच VIDEO

Funny Viral Video: सोशल मीडियावर सध्या दोन प्राण्यांच्या भांडणाचा गमतीदार व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल.

Tanvi Pol

Animal Fighting Video: सोशल मीडियावर आपल्याला प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. कधी घरात पाळण्यात येणाऱ्या कुत्र्यांचे तर कधी मांजरीचे. प्राण्यांचे व्हिडिओ पाहून अनेकदा हसू आवरत नाही. त्यातच सध्या सोशल मीडियावर असाच एक गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, मात्र या व्हायरल व्हिडिओत कुत्रा आणि कोंबड्याचे भांडण सुरु आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक रस्ता दिसून येत आहे. ज्या रस्त्यावर एक कुत्रा आहे आणि एक कोंबडा आहे. काही वेळात कुत्रा आणि या कोंबड्यामध्ये भांडण सुरु होते. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही पाहिले तर लहानसा कोंबडा त्या कुत्र्याला मारत आहे. शेवट पर्यंत दोघांचे भांडण सुरु राहते. तिथे असलेला एक तरुण मोबाईमध्ये सर्व घटना कैद करत असून सध्या सोशल मीडियावर दोघांच्या भांडणाचा व्हिडिओ (Video)तूफान व्हायरल होत आहे.

प्राण्यांच्या मस्तीचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''animal_lover_indian_'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''व्हिडिओ न बनवून या दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न करा'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पाहताच मोठ्या संख्येने व्हिडिओवर प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' काय राव हे पण हाणामारी करत आहेत'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''आयुष्य म्हणजे धाडस आणि पुढाकार घेणे'' तर अनेकांनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून माघार

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT