Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! अवघ्या काही सेकंदात 16 लाखांचे दागिने लंपास, महिलांची चलाखी पाहून डोक धराल

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका चोरीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र चोरीची घटना कशी घडली ते संपूर्ण सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

Tanvi Pol

Cctv Video Viral: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या देशातील नाही तर जगभरातील अनेक गुन्हेगारीच्या घटना समजत असतात. कुठे खुन होतो तर कधी अपघात. मात्र त्यातही चोरीच्या घटना जास्त दिसून येतात. मग कधी घरात चोरी होते मग कधी सोन्याच्या दुकानात. सर्व चोरीच्या घटनांचे व्हिडिओही पाहण्यास मिळतात. सध्य सोशल मीडियावर असाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात भरदिवसा काही महिलांना सोनाऱ्याच्या दुकानातून चोरी केलेली आहे. मात्र सध्या त्या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ(Video) तुम्हाला एक सोनारेच दुकान दिसत आहे. ज्यात एक सोनार आहे आणि काही महिला त्या दुकानात बसलेल्या आहेत. मात्र चार मधल्या दोन महिला सोनाऱ्याशी संवाद साधत आहेत तर दोन महिला दुकानाच्या दरवाजाजवळ बसलेल्या आहेत. काही वेळात त्यातील दोन महिलांनी कानातले टोचून घेण्याच्या नादाने सोनाऱ्याचे लक्ष वळवले आणि दरवाजाजवळ बसलेल्या दोन महिलांनी सोनाऱ्याच्या दुकानातून काही दागिने चोरताना दिसत आहे. सर्व प्रकार दुकानात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे.

चोरीची संपूर्ण घटना एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर,'' चार महिलांनी 16.5 लाखांचे दागिने लुटले'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हिडिओला नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहेत शिवाय अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले की,'' बापरे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' काय राव महिला आहेत'' अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पॉइंट टेबलमध्येही मोठा उलटफेर

Monday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होतील, ५ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT