Train Passengers Dancing Video: मुंबई लोकल म्हणजे गर्दीने भरलेले डब्बे शिवाय सीट मिळवण्यासाठी धावपळ करणारे प्रवासी,या सर्व गोष्टी रोजच्या आहेत.मात्र अनेकदा याच गजबजलेल्या ठिकाणी अनेक भन्नाट गोष्टी घडतात आणि त्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.त्यात लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यामध्ये बॉलीवूडमधील प्रसिद्ध गाण्यावर पुरुष डान्स करताना आणि गाणं गाताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत (Video)तुम्हाला लोकल ट्रेनमधील पुरुषांचा डब्बा दिसत आहे.ज्यात काही वयोरुद्ध व्यक्तींचा एक ग्रुप आहे आणि त्यातील एक काका 'काटा लगा' हे गाणं गाताना दिसत आहे.शिवाय त्या काकांना अन्य त्याच्या ग्रुपमधील सदस्य साद देत असून काही शिट्टा वाजवत आहेत तर काही टाळ्या.मुख्य म्हणजे काहीजण तर धम्माल डान्स करत आहेत.सर्वांचा उत्साह व्हिडिओमध्ये दिसून येत असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
लोकल ट्रेनमधील हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील jist.news या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा असून पुन्हा एकदा जोरदार व्हायरल झालेला आहे.व्हिडिओला लोकांनी ५० हजारहुन अधिक लाईक्स केलेले आहे तर व्हिडिओला व्ह्यूज लाखोंंच्या संख्येने मिळालेले आहेत.
व्हिडिओ नागरिकांना ऐवढा आवडला की प्रत्येकाला शेअरही करत आहेत आणि त्यावर प्रतिक्रियाही करत आहेत.त्यातीलच एका यूजरने लिहिले आहे,''खूप सुंदर!!'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे,''आपल्या सर्वांना अशाच आनंदाची गरज आहे'' तिसऱ्या यूजरने लिहिले आहे,''ये है मुंबईकर'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.