Meerut Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : बाप असावा तर असा... मुलीच्या घटस्फोटानंतर ढोल ताशा वाजवत लेकीला आणलं घरी, नेटकऱ्यांनी म्हटलं...

Meerut Viral Video : मेरठमध्ये मुलीच्या घटस्फोटानंतर वडिलांनी ढोल-ताशाच्या गजरात तिचं भव्य स्वागत केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवर नेटकऱ्यांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Alisha Khedekar

  • मेरठमध्ये मुलीच्या घटस्फोटानंतर वडिलांनी अनोख्या पद्धतीने स्वागत केले

  • ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात साजरा केला आनंद

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पोटच्या मुलांसाठी आई वडील काहीही करू शकतात. मुलांच्या आनंदातच आई वडिलांचा आनंद असतो असं म्हटलं जात. याचीच प्रचिती मेरठमध्ये घडलेल्या एका घटनेदरम्यान आली आहे. अनेकदा ब्रेकअप झाल्यावर किंवा घटस्फोट झाल्यावर नैराश्येत जाऊन महिला रडताना चित्र पाहायला मिळतं. तसेच मुलीचा संसार मोडला म्हणून कुटुंब देखील तितकंच तणावात असतं. मात्र आपल्या मुलीचा घटस्फोट झाल्याच्या आनंदात पेशाने न्यायाधीश असलेल्या वडिलांनी ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओ मधील महिलेचं नाव प्रतीक्षा असे आहे. ती मेरठमधील शास्त्री नगरची रहिवासी आहे. २०१८ मध्ये तिचा विवाह शहाजहानपूरचे रहिवासी असलेल्या मेजर गौरव अग्निहोत्री यांच्याशी झाला होता. या जोडप्याला एक मुलगाही आहे. मात्र, कालांतराने त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ लागल्या. सासरच्या घरातून होणारा छळ आणि सततच्या वादांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. यामुळे दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर, ४ एप्रिल रोजी त्या जोडप्याला अधिकृतपणे घटस्फोट मिळाला. यानंतर ही बातमी घेऊन प्रतीक्षा घरी गेली असता तिच्या वडिलांनी आणि कुटुंबीयांनी तिचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. तिच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळेस प्रतिक्षाच्या कुटुंबीयांनी “आय लव्ह माय बिटिया” असा संदेश लिहिलेले एकसारखे टीशर्ट घालून आनंद साजरा केला.

हे क्षण कॅमेऱ्यात चित्रित झाले असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवगेळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या वडिलांचे कौतुक केले आहे, तर काहींनी मुलीच्या घटस्फोटावर वडिलांनी दाखवलेल्या उत्साहाला ट्रोल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पहाटेपासूनच पावसाची संतधार

Shocking : लोहगडासारखं हत्याकांड! बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीला संपवलं, चॅट्समुळे पत्नीचा डाव फसला अन्...

Ladki Bahin Yojana : जून महिन्याचा हप्ता या तारखेला होणार जमा; पण 'या'महिलांचे ₹१५०० बंद, मोठी अपडेट आली समोर

Konkan Tourism : समुद्रकिनारे, धबधबे अन् तलाव, रिमझिम पावसात कोकणातील 'हे' ठिकाण दिसते लय भारी

Dombivli : डोंबिवलीतील ५० कुटुंबाचे तडकाफडकी स्थलांतर; नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT