Viral Video of vande bharat Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : हातोड्याने वंदे भारत ट्रेनची काच फोडणारा कोण? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Viral Video of vande bharat : आता बातमी आहे एका व्हायरल व्हिडिओची. या व्हिडिओत एक व्यक्ती वंदे भारत ट्रेनची काच फोडत असल्याचं दिसतंय. मात्र, ही व्यक्ती रागारागाने हातोड्याने काच फोडून ट्रेनचं नुकसान का करतेय? ट्रेनचं नुकसान करण्यामागे काही षडयंत्र आहे का? हा व्हिडिओ कुठला आहे? याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहुयात.

Mayuresh Kadav

मुंबई : वंदे भारत ट्रेनची काच फोडल्याची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रागारागाने हातोड्याने काच फोडून ट्रेनचं नुकसान करत असल्याचं दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. हा व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आहे? याची पडताळणी आमच्या टीमने केली.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातोड्याने वंदे भारत ट्रेनची काच फोडताना दिसत आहे. यामुळे काच फोडणारा व्यक्ती कोण आहे, असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत. ही व्यक्ती दणादण हातोड्याने ही व्यक्ती रेल्वेची काच फोडतेय. गाडी स्टेशनवर असताना ही व्यक्ती रेल्वेची काच का फोडतेय? काच फोडताना या व्यक्तीला कुणी थांबवत का नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही व्यक्ती रागारागाने रेल्वेचं नुकसान करत असल्याचा मेसेज व्हिडिओसोबत व्हायरल होतोय.

रेल्वेचं नुकसान म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, असं नुकसान करणं म्हणजे गुन्हाच आहे. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली. ही ट्रेन कुठली आहे? 14 सेकंदाच्या या व्हिडिओत ही व्यक्ती ट्रेनची काच फोडून टाकते. त्यामुळे अनेक मेसेज व्हायरल होतायत. काय मेसेजमध्ये दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं की, देशाच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत अशी कृत्यं रोजच होत राहतील'. अजून एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय.त्यामध्ये त्याने लिहिलंय की,लोकांच्या मनात भीती आहे की हे रेल्वेच्या विरोधात काहीतरी षडयंत्र आहे. कोणीतरी रील बनवण्यासाठी ट्रेनचे नुकसान तर केले नाही ना? असा सवाल उपस्थित केलाय.

या व्हिडिओचं सत्य जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी रेल्वे अधिकाऱ्यांना भेटले. मात्र, त्यांनी हे प्रकरण आमच्या हद्दीत येत नसल्याचं सांगत यावर बोलण्यास नकार दिला.

त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याची पडताळणी सुरू केली. रेल्वे हा सर्वांसाठी जिव्हाळ्याच्या विषय आहे. रोज कोट्यवधी लोक रेल्वेनं प्रवास करत असतात. त्यामुळे आम्ही या व्हिडिओमागचं सत्य शोधण्यासाठी व्हिडिओची पडताळणी केली, त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

काच फोडण्याचं षडयंत्र नसून, वंदे भारतची काच नवीन लावली जातेय

खिडकीची फुटलेली ग्लास बदलण्याची ही एक प्रक्रिया आहे.

तामिळनाडूच्या तिरुनेलवेली डेपोतील हा व्हिडिओ आहे.

हातोड्याने काच फोडणारी ही व्यक्ती इंजिनियर आहे.

इंजीनियर भेगा पडलेली काच फोडून दुसरी लावतोय

काच फोडतानाचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला

लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा. लोकांपर्यंत चुकीचा मेसेज पोहोचावा, यासाठी असे मेसेज व्हायरल केले जातात. मात्र, आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली त्यावेळी हातोड्याने रागाच्या भरात रेल्वेची काच फोडत असल्याचा दावा असत्य ठरला. फुटलेली काच बदलतानाचा हा व्हिडिओ आहे.त्यामुळे अशा व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT