Viral VIdeo Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance Viral VIdeo: एसयूव्हीची डिलिव्हरी मिळताच शोरूममध्ये नाचू लागलं संपूर्ण कुटुंब! आनंद महिंद्रा म्हणाले...

Scorpio Buying Dance Viral Video: एसयूव्हीची डिलिव्हरी मिळताच शोरूममध्ये नाचू लागलं संपूर्ण कुटुंब! आनंद महिंद्रा म्हणाले...

Satish Kengar

Social Media Viral Video: आपल्या ड्रीम कारची डिलिव्हरी मिळणे हा कोणासाठीही सर्वात आनंदाचा क्षण असतो. जेव्हा दीर्घ प्रतिक्षेनंतर डिलिव्हरी मिळते तेव्हा तो क्षण आणखीनच अविस्मरणीय बनतो. महिंद्राच्या डीलरशिपमधूनही असेच चित्र समोर आले आहे.

एका कुटुंबाला महिंद्रा स्कॉर्पिओची डिलिव्हरी मिळाल्यावर एन. एसयूव्हीच्या डिलिव्हरीमुळे कुटुंब इतके खूश झाले की ते डीलरशिपच्या शॉपमधेच नाचू लागले. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Anand Mahindra Twitter: आनंद महिंद्रा यांनी शेअर केला व्हिडीओ

हा व्हिडीओ महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. व्हिडीओ (Viral Video) पोस्ट करत त्यांनी लिहिले आहे की, "भारतीय वाहन उद्योगात काम करण्याचा हा खरा पुरस्कार आणि आनंद आहे..."  (Latest Marathi News)

या व्हिडिओमध्ये कारची डिलिव्हरी मिळाल्यानंतर संपूर्ण कुटुंब चित्रपटाच्या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. एका जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ही एसयूव्ही खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. (Viral Video)

Mahindra Scorpio N ही एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय कारपैकी एक आहे. ही कार बाजारात लॉन्च झाल्यापासून तिच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. प्रचंड मागणीमुळे याचा प्रतीक्षा कालावधी सतत वाढत आहे. (Viral Video)

याच्या काही प्रकारांसाठी ग्राहकांना 18 महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र यात असे काही प्रकार देखील आहेत ज्यांचा प्रतीक्षा कालावधी खूपच कमी आहे. ही SUV पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. (Viral Video)

या कारच्या पेट्रोल प्रकारात कंपनीने 2.0-लिटर क्षमता, टर्बोचार्ज्ड इंजिन दिले आहे. जे 200 bhp ची पीक पॉवर आणि 370 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन एकतर 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. (Viral Video)

तसेच याचा डिझेल प्रकारात कंपनीकडे 2.2-लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. जे 172.5bhp पीक पॉवर आणि 400Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT