Nagin Dance Video Viral Saam tV
व्हायरल न्यूज

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

Nagin Dance Video Viral : सोशल मीडियावर दोन तरुणींचा भर रस्त्यात डान्स करताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. वर्दळीच्या महामार्गावर व्हिडिओ बनवणाऱ्या या तरुणींना पोलिसांनी खाकी दम देत गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी रील बनवली

  • भर रस्त्यात तरुणींचा नागीण डान्स

  • पोलिसांनी दाखवला खाकी बडगा

  • तरुणींवर गुन्हा दाखल

सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुण मंडळी काहीही करताना पाहायला मिळत आहेत. वेगवेगळे स्टंट, शासकीय गोष्टींचा दुरुपयोग या सगळ्या गोष्टी फक्त फेम मिळवण्यासाठी. पण या फेम मुळे आयुष्य उध्वस्तही होऊ शकत. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तरुणी महामार्गाच्या मधोमध बसून नागीण डान्स करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओ नंतर तरुणींना ट्रोल केलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ-कानपूर महामार्गावरील गडनखेडा बायपासजवळ नागिन नृत्य सादर करताना दोन तरुणींचा रील बनवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी एक तरुणी आणि तिच्या मैत्रिणीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, रात्रीच्या वेळी एका वर्दळीच्या महामार्गाच्या मध्यभागी दोन मुली नाचत आहेत. कधी जमिनीवर बसून, तर कधी झोपून, तर कधी विचित्र पोझमध्ये त्या नागिन डान्स करताना दिसत आहे. जवळपास फक्त वेगाने येणाऱ्या वाहनांचा रस्ता होता. या मुलींना नाचताना कशाचेही भान नव्हते. फक्त एका लाईक आणि शेअरच्या हव्यासापोटी या तरुणी महामार्गावर जीव धोक्यात घालून नाचत होत्या.

दरम्यान पोलिसांनी हा व्हिडिओ पाहताच तातडीने तपास सुरु केला. आणि दोन्ही मुलींचा ठाव ठिकाणा शोधून काढला. दोन्ही मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. कोणी तरुणींना ट्रोल केलं आहे . तर काही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये तरुणींच्या या डान्सला मनोरंजनात्म्क दृष्टीने पाहिल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT