Saam Tv
व्हायरल न्यूज

आई मोबाईलमध्ये व्यस्त; चिमुकल्याचा खेळताना हात लिफ्टमध्ये अडकला; भयंकर व्हिडिओ

Kid hand stuck in elevator doors: सोशल मीडियावर भयंकर अशा घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा त्यात लहान मुलांचे व्हिडिओ असतात. सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लहान मुलासोबत झालेल्या अपघाताचा आहे.

Tanvi Pol

accidents with children: आजच्या मोबाईल युगात पालक आणि लहान मुलांमधील संवाद कमी होत चालला आहे आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला वेळोवेळी दिसून येतात. अशाच एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक आई मोबाईलमध्ये गुंग असताना तिच्या लहान मुलाचा हात लिफ्टच्या दरवाजात अडकतो.

ही घटना एका निवासी टॉवरमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये(Video) स्पष्ट दिसते की, आई मोबाईलमध्ये काही तरी बघण्यात व्यस्त असते आणि तिचा चिमुकला मुलगा तिच्याबरोबरच लिफ्टमध्ये खेळत उभा असतो. लिफ्टचा दरवाजा उघडण्याच्या वेळी मुलाचा हात दरवाजात अडकतो आणि तो जोरात किंचाळतो. मात्र काही क्षण आईला काहीच कळत नाही. जेव्हा ती मुलाच्या ओरडण्याकडे लक्ष देते, तेव्हा ती घाबरून जाते आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते.

व्हायरल (Viral) होत असलेली ही घटना नेमकी कुठली आहे ते अद्याप समजू शकलेले नाही. पण गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती,ज्यात लहान मुलाने चालत्या लिफ्टचा दरवाजा घडण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर प्रत्येक पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

हा प्रकार पाहिल्यानंतर अनेक नेटकरी वर्गातून विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली,''संपूर्ण आईचा दोष आहे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''पागल बाई आहे येवढं काय होत मोबाईलमध्ये'' तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''खुपच भयंकर घडलं'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

SCROLL FOR NEXT