Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शेतकर्‍याला सलाम! लकी कारची अंत्ययात्रा काढली, स्क्रॅप करण्याऐवजी पुरले, व्हिडीओ व्हायरल

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या गुजरातमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे नक्की काय घडले असेल ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Gujrat Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला जगभरातील अनेक अतरंगी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. कधी व्यक्तीचे कारनामे तर अनेक केलेले अनोखे जुगाड. मात्र सध्या गुजरातमधील एका व्हिडिओची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे. जिथे एका शेतकऱ्याने आपल्या आवडत्या कारची

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक कार दिसत आहे. ज्या कारला फुलांनी सजवली आहे. शिवाय कारच्या वरच्या भागावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवलेल्या आहे, अशा पद्धतीने कारला सजवण्यात आलेले आहे. काही वेळात एका मोठ्या खड्ड्यात वाहन उतरवण्यात येत आहे. मग त्यानंतर अंतिम संस्कारच्या पद्धतीने कारवर एक हिरव्या रंगाचे कापड अथंरलेले दिसत आहे. व्हिडिओत(Video) पुढे पाहिले तर काही व्यक्ती कारच्या पुढे उभे राहून फोटो काढताना दिसत आहे. एवढेच नाही तर सर्व पाहण्यासाठी गावातील अनेक व्यक्ती तिथे जमलेले दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून तो व्हिडिओ एक्सवरील ''@Raajeev_Chopra'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,''एका शेतकऱ्याने आपली नशीबवान गाडी विकली नाही तर स्वतःच्या शेतात समाधी दिली समाधी एखाद्या महापुरुषाला किंवा कोणत्याही मानवाला दिली जाते पण गुजरातमध्ये त्याच्या भाग्यवान कारला त्याच्याच शेतात शास्त्रोक्त पद्धतीने बोलावून समाधी देण्यात आली'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT