MP Police Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

MP Police Viral Video: तिरंगा यात्रेत पोलीस अधिकाऱ्याचा झकास डान्स, पाहा व्हिडीओ...

Latest Viral Video: तिरंगा यात्रेत पोलीस अधिकाऱ्याचा झकास डान्स, पाहा व्हिडीओ...

साम टिव्ही ब्युरो

MP Police Viral Video: संपूर्ण देश स्वातंत्र्योत्सव साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. याचदरम्यान, मध्य प्रदेशातून एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एक पोलिस अधिकारी डान्स करताना दिसत आहे. हा पोलीस अधिकारी एक इन्स्पेक्टर आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी देशभक्तीच्या गाण्यांवर नाचताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूर पोलिसांनी 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी तिरंगा यात्रा काढली होती. ज्यामध्ये 200 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. हा व्हिडीओही त्याच तिरंगा यात्रेचा आहे.

ज्यात पोलीस अधिकारी अनिल यादव यांनी ”सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पर डालो, सबसे आगे होंगे हम हिन्दुस्तानी…'' गाण्यावर नाचले. (Latest Marathi News)

अनिल यादव यांचा हा डान्स पाहून त्याच्या मागे उभ्या असलेल्या पोलीसांनीही गाण्यावर नाचायला सुरुवात केली. एका पोलिसाने त्यांचा डान्सचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर टाकला, जो आता व्हायरल झाला आहे.

हातात झेंडा घेऊन पोलीस अधिकारी एका देशभक्तीच्या गाण्याच्या तालावर मनापासून नाचत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला लोकांची खूप पसंती मिळत आहे. व्हिडीओबद्दल अनिल यादव यांनी सांगितले की, हा व्हिडीओ तिरंगा यात्रेदरम्यानचा आहे. जिथे मीही सर्व पोलिसांसह तिरंगा यात्रेत सहभागी झालो होतो. मला देशभक्तीची गाणी आवडतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटलांचा राजीनामा

MVA Seat Sharing : महाराष्ट्रात मोठा भाऊ काँग्रेस, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा मिळाल्या?

Maharashtra Election: पुण्यात आधी खोके सापडले, आता पेट्या; नाकाबंदीवेळी कारमधून लाखोंची कॅश जप्त, पोलिसांची धडक कारवाई

Maharashtra Election : शेकापचे ५ उमेदवार जाहीर, 'मविआ'बद्दलच्या चर्चांना पूर्णविराम, जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

Maharashtra Election : महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? कोणतं सरकार चांगलं? सकाळ-CSDCचं सर्वेक्षण वाचा क्लिकवर

SCROLL FOR NEXT